मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला ‘बेशरम’चे झाड अर्पण!
By Admin | Updated: May 16, 2017 00:50 IST2017-05-16T00:50:17+5:302017-05-16T00:50:17+5:30
लोणार येथील विकास कामे खोळंबली : कर्मचारी गैरहजर राहत असल्याचा आरोप

मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला ‘बेशरम’चे झाड अर्पण!
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार : सतत गैरहजर राहणे व आपली जबाबदारी झटकून रजेवर जाणे, अशा स्थानिक नगर परिषदच्या मुख्याधिकारी विजय लोहकरे यांच्या बेजबाबदारपणामुळे नागरिक त्रस्त झाले असून, लोणार नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारीही कामचुकार झाले असल्याबाबत शिवसेना शहरप्रमुख पांडुरंग सरकटे यांनी १४ मे रोजी त्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार व नगर विकास मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार दाखल करताच त्यापाठोपाठ राष्ट्रवादी शहर अध्यक्ष बाळासाहेब आखाडे यांनी १५ मे रोजी मुख्याधिकारी यांच्या खुर्चीला बेशरमचा हार नव्हे, तर झाडच अर्पण केले.
जागतिक पर्यटनस्थळ लोणार सरोवर शहराच्या विकासात्मक कामांचा खोळंबा होत असताना मुख्याधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र बघायला मिळते. या प्रकारांमुळे ‘गाव तसे चांगले; परंतु मुख्याधिकाऱ्यांनी वेशीला टांगले’, असे म्हणण्याची वेळ शहरवासीयांवर आल्याचे दिसत आहे. सतत गैरहजर राहणे व आपली जबाबदारी झटकून रजेवर जाणे, अशा मुख्याधिकारी विजय लोहकरे यांचा बेजबाबदारपणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
लोणार नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारीही कामचुकार झाले असल्याबाबत शिवसेना शहरप्रमुख पांडुरंग सरकटे यांनी १४ मे रोजी त्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार व नगर विकास मंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे तक्रार दाखल करताच त्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष बाळासाहेब आखाडे यांनीही मुख्याधिकारी यांच्या खुर्चीला १५ मे रोजी बेशरमचा हार नव्हे; तर झाडच अर्पण केले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस किशोर पाटील, डॉ.सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.विक्रांत मापारी, ओमप्रकाश घायाळ, विठ्ठल जाधव, डॉ.संतोष आडे, सालार खान, सय्यद उमर, गुलाब सरदार उपस्थित होते.
आखाडे यांचा आरोप
रस्त्यावर नेहमीच आक्रमक भूमिका घेणारी शिवसेना लोणार नगर परिषदेत मवाळ भूमिका घेत असल्याने सत्ताधारी पक्षासोबत शिवसेना विरोधी पक्षनेता आणि नगरसेवकांनी हातमिळवणी करून घेतल्याचा आरोप यावेळी बाळासाहेब आखाडे यांनी केला.