घरकुलात राहणारे लाभार्थी अनधिकृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:31 IST2021-04-26T04:31:26+5:302021-04-26T04:31:26+5:30

मेहकर : नगर परिषदेने जानेफळ रस्त्यावरील गरजू व गरीब लोकांसाठी बांधलेल्या घरकुलांमध्ये राहत असलेले लाभार्थी हे अनधिकृतपणे राहत ...

Beneficiaries living in the household are unauthorized | घरकुलात राहणारे लाभार्थी अनधिकृत

घरकुलात राहणारे लाभार्थी अनधिकृत

मेहकर : नगर परिषदेने जानेफळ रस्त्यावरील गरजू व गरीब लोकांसाठी बांधलेल्या घरकुलांमध्ये राहत असलेले लाभार्थी हे अनधिकृतपणे राहत असल्याने मुख्य अधिकारी सचिन गाडे यांनी सर्व घरकुलांवर नोटीस लावली आहे. त्यामुळे घरकुलात राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़

मेहकर नगर परिषदेने मागील काही वर्षांपूर्वी आयएचएसडीपी योजनेअंतर्गत गरजू व गरीब लोकांसाठी जानेफळ रस्त्यावरील खुल्या जागेत घरकुलाचे बांधकाम केले. मात्र घरकुलाचे पूर्ण बांधकाम होत नसताना घरकुलांच्या मंजूर झालेल्या यादीतील लाभार्थ्यांकडून पंधरा हजार रुपये घेऊन नगर परिषदेने पावतीसुद्धा दिली होती़ त्यामुळे अंदाजे एक हजारच्या वर कुटुंबे या घरकुलांत राहत आहेत. गेल्या २१ एप्रिल रोजी घरकुलातील अश्फाक शाह नामक लाभार्थ्याने घरकुलांमध्ये राहत असलेल्या लोकांना पिण्याचे पाणी व विद्युत पुरवठ्याची सुविधा देण्यात यावी यासाठी घरकुलाच्या परिसरात अपूर्णपणे बांधण्यात आलेल्या १३० फूट उंची असलेली पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईलने आंदोलन केले होते. त्यामुळे पोलीस प्रशासन, नगर परिषद व वीज वितरणचे अधिकारी त्रस्त झाले होते. शेवटी मुख्याधिकारी सचिन गाडे यांनी आंदोलनकर्त्याला २२ एप्रिल रोजी चर्चेसाठी बोलावण्यासाठी लेखी पत्र दिल्याने आंदोलनकर्त्याने आंदोलन मागे घेतले होते. त्याच वेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्याला अटक करून विविध गुन्हेसुद्धा दाखल केले होते. नगर परिषदेने बांधलेल्या घरकुलांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा, पिण्याचे पाणी व विद्युत पुरवठा हे अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे नगर परिषदेने कोणत्याही लाभार्थ्याला अधिकृत ताबा दिलेल्या नाही. काही मंडळींनी घरकुलांमध्ये अनधिकृतपणे ताबा घेऊन विद्युत कनेक्शनसुद्धा घेतल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे केव्हाही अपघात व अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्यता आहे. नगर परिषद याला जबाबदार नसल्याचे नोटीसपत्र मुख्य अधिकारी सचिन गाडे यांनी घरकुलावर चिकटवल्याने घरकुलांमध्ये अवैधरीत्या राहत असलेल्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़ आगामी नोव्हेंबरमध्ये येणाऱ्या नगर परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय पक्षांची नेतेमंडळी घरकुलात राहणाऱ्या लाभार्थ्यांना कितपत वाचवतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Web Title: Beneficiaries living in the household are unauthorized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.