जातीवाचक शिवीगाळ करून महिलेस मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:22 IST2021-06-30T04:22:32+5:302021-06-30T04:22:32+5:30
देऊळगाव राजा : शेतीच्या वादातून महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना देऊळगाव मही येथे २८ जून राेजी घडली़. ...

जातीवाचक शिवीगाळ करून महिलेस मारहाण
देऊळगाव राजा : शेतीच्या वादातून महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना देऊळगाव मही येथे २८ जून राेजी घडली़. या प्रकरणी देऊळगाव राजा पाेलिसांनी चाैघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
२० जून रोजी जमिनीचा वाद झाला हाेता. यावेळी देऊळगाव मही येथील दिगंबर नारायण शिंगणे, विनायक नारायण शिंगणे, सचिन विनायक शिंगणे, नितीन दिगंबर शिंगणे यांनी फिर्यादी महिलेस जातीवाचक शिवीगाळ करून, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद महिलेने पाेलिसात दिली हाेती. या प्रकरणी पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी तपास करून, २८ जून रोजी देऊळगाव मही येथील चाैघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे करीत आहे.