क्षुल्लक कारणावरून एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:33 IST2021-05-24T04:33:15+5:302021-05-24T04:33:15+5:30

शेलापूर येथील किसन चंपालाल जैस्वाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २२ मे रोजी शेतात काम करीत असताना त्या ठिकाणी सुभाष ...

Beating one for a trivial reason | क्षुल्लक कारणावरून एकास मारहाण

क्षुल्लक कारणावरून एकास मारहाण

शेलापूर येथील किसन चंपालाल जैस्वाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २२ मे रोजी शेतात काम करीत असताना त्या ठिकाणी सुभाष गोकुळ जैस्वाल याने येऊन माझ्या शेताचा धुरा का जाळला, अशी विचारणा केली. त्यावर मी काही धुरा जाळला नाही, असे सांगितले असता सुभाष जैस्वाल याने लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली तसेच लाठीने पायावर, हातावर आणि पाठीवर मारून जखमी केले आहे. तसेच तोंडावर लाठी मारून दात पाडला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर थोड्या वेळाने प्रभाकर गोकुळ जैस्वाल आणि राज गजानन जैस्वाल यांनी किसन जैस्वाल यांच्या घरासमोर येऊन शिवीगाळ केली. चंपालाल जैस्वाल यांचा मुलगा चेतन हा समाजवण्यास गेला असता त्यास शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी शेलापूर येथील सुभाष गोकुळ जैस्वाल, प्रभाकर गोकुळ जैस्वाल आणि राज गजानन जैस्वाल या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Beating one for a trivial reason