भाजपच्या पक्ष कार्यालयातच केली पदाधिकाऱ्यांना मारहाण; मेहकरात अंतर्गंत धुसफुस बाहेर
By संदीप वानखेडे | Updated: December 3, 2023 20:05 IST2023-12-03T20:05:27+5:302023-12-03T20:05:57+5:30
भाजपच्या मेहकर तालुकाध्यक्षपदी दाेघांची नियुक्ती करण्यात आल्याने अंतर्गंत धुसफुस बाहेर आली हाेती.

भाजपच्या पक्ष कार्यालयातच केली पदाधिकाऱ्यांना मारहाण; मेहकरात अंतर्गंत धुसफुस बाहेर
मेहकर : भाजपच्या मेहकर तालुकाध्यक्षपदी दाेघांची नियुक्ती करण्यात आल्याने अंतर्गंत धुसफुस बाहेर आली हाेती. ही धुसफुस ३ डिसेंबर राेजी विकाेपाला गेली. पक्षाच्या कार्यालयातच नवनियुक्त तालुकाध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांना दुसऱ्या गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मारहाण केली. त्यामुळे, जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, भाजपच्या वरिष्ठांनी या घटनेची दखल घेत मारहाण करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली.
भाजपच्या मेहकर येथे निवडणूक प्रमुख यांच्या वाररुममध्ये ३ डिसेंबर राेजी विधानसभा निवडणूक प्रमुख प्रकाश गवई आणि जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनराव वानखेडे, तालुकाध्यक्ष सारंग माळेकर हे उपस्थित हाेते. यावेळी पक्षाचे काही पदाधिकारी तेथे आले़ त्यांनी तिन्ही पदाधिकाऱ्यांशी वाद घालून मारहाण सुरू केली.
यामध्ये तिघेही जखमी झाले आहेत. या घटनेची भाजपचे वरिष्ठांनी गंभीर दखल घेतली आहे. तसेच शिव ठाकरे, प्रल्हाद लष्कर, अक्षत दिक्षीत, चंदन आडेलकर, राेहित साेळंके, विकास लष्कर या सहा पदाधिकाऱ्यांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. याविषयीचे भाजपचे जिल्हाध्यक्ष डाॅ. गणेश मान्टे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांच्या आदेशाने याविषयी प्रसिद्ध पत्रक जारी केले आहे.