जवळा पळसखेड येथे पैशांच्या वादातून मारहाण; तिघांविरोधात गुन्हा दाखल
By योगेश देऊळकार | Updated: August 25, 2023 19:17 IST2023-08-25T19:17:41+5:302023-08-25T19:17:45+5:30
जवळा पळसखेड येथील जितेंद्र देविदास चव्हाण (वय ४०) यांनी शेगाव ग्रामीण पोलिसात तक्रार दिली

जवळा पळसखेड येथे पैशांच्या वादातून मारहाण; तिघांविरोधात गुन्हा दाखल
खामगाव : पैशांच्या वादातून मारहाण झाल्याची घटना शेगाव तालुक्यातील जवळा पळसखेड येथे २४ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी शेगाव ग्रामीण पोलिसांनी तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
जवळा पळसखेड येथील जितेंद्र देविदास चव्हाण (वय ४०) यांनी शेगाव ग्रामीण पोलिसात तक्रार दिली. ते घरी हजर असताना गावातीलच सुनील लयनसिंग पवार व त्यांची मुले अजय सुनील पवार व विशाल सुनील पवार त्यांच्या घरी आले. जागेच्या पैशांच्या कारणावरून वाद करून फिर्यादी व त्यांची पत्नी आशा चव्हाण यांना आरोपींनी मारहाण केली. यामुळे त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली. सोबतच फिर्यादीच्या आई-वडिलांनाही लोटपोट करून मारहाण व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी चव्हाण यांच्या तक्रारीवरून उपरोक्त आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकाॅ अरुण मेटांगे करीत आहेत.