मारहाण झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:39 IST2021-09-23T04:39:31+5:302021-09-23T04:39:31+5:30

मूळ पातुर तालुक्यातील शिरपूर येथील युवक आसिफ शाह (३०) हा मागील काही वर्षांपासून मेहकर येथे मजुरी करण्यासाठी कुटुंबासह गेला ...

The beaten youth died during treatment | मारहाण झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

मारहाण झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

मूळ पातुर तालुक्यातील शिरपूर येथील युवक आसिफ शाह (३०) हा मागील काही वर्षांपासून मेहकर येथे मजुरी करण्यासाठी कुटुंबासह गेला होता. मेहकर येथे पती-पत्नीचे भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या आसिफ शाह यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची घटना ११ सप्टेंबर रोजी घडली होती. या प्रकरणी मेहकर पोलिसांनी १४ सप्टेंबर रोजी दोघांवर गुन्हा दाखल केला होता. पती-पत्नीचे भांडण सोडविण्यासाठी का आला, या कारणावरून आरोपी सलीम शहा, यांनी शिरपूर येथील आसिफ शाह यांच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने हल्ला केला होता. या हल्ल्यात आसिफ शाह गंभीर झाल्याने, त्याला उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले होते, परंतु १० ते १२ दिवसांनंतर उपचारादरम्यान आसिफ शाह यांचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेहकर पोलीस हल्ला करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्ह्यात वाढ करणार आहेत.

Web Title: The beaten youth died during treatment