विहीरीत पडलेल्या अस्वलास वनविभागाने दिले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:36 IST2021-02-11T04:36:46+5:302021-02-11T04:36:46+5:30

चिखली तालुक्यातील किन्होळा येथील रहिवासी पाटीलबुवा भिवसन बाहेकर यांचे डोंगरशेवली शिवारातील गट क्र. ३१६ मध्ये शेत आहे. या ...

The bear that fell into the well was given life by the forest department | विहीरीत पडलेल्या अस्वलास वनविभागाने दिले जीवदान

विहीरीत पडलेल्या अस्वलास वनविभागाने दिले जीवदान

चिखली तालुक्यातील किन्होळा येथील रहिवासी पाटीलबुवा भिवसन बाहेकर यांचे डोंगरशेवली शिवारातील गट क्र. ३१६ मध्ये शेत आहे. या शेतातील विहिरीत अस्वल पडले असल्याचे सकाळी स्थानिकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर याची माहिती स्थानिकांनी वनविभागाला दिली. त्यांतर उपवन संरक्षक अक्षय गजभिये, एसीएफ रणजीत गायकवाड यांच्या निर्देशानुसार बुलडाणा वन विभागाचे बचाव पथकातील कर्मचारी वनपाल राहुल चव्हाण, संदीप मान्टे, विलास मेरत, संदीप मडावी व अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यापूर्वी घटनास्थळाचा परिसर या बचाव पथकाने निर्मनुष्य केला. जेणेकरून कुठलीही अप्रिय घटना घटना नाही, या दृष्टीने ही खबरदारी घेण्यात आली. त्यानंतर विहितीत बाज टाकून अस्वलास बाहेर काढण्याचे प्रयत्न झाले. त्यात यश न आल्तल्च्यायामुळे विहीरीत पिंटरा टाकण्यात आला व बऱ्याच परिश्रमानंतर अस्वल पिंजऱ्यात शिऱल्यावर तो बाहेर काढण्यात आला. त्यानंतर या अस्वलास लगतच्या ज्ञानगंगा अभयारण्यात सुखरूपपणे सोडण्यात आले.

Web Title: The bear that fell into the well was given life by the forest department