बॅटरी चोरणारी टोळी संग्रामपुरात जेरबंद

By Admin | Updated: November 22, 2015 02:06 IST2015-11-22T02:06:39+5:302015-11-22T02:06:39+5:30

मध्यप्रदेशातील दोन आरोपी अटक; तीन फरार.

Battery stealing gang Sangramapura militant | बॅटरी चोरणारी टोळी संग्रामपुरात जेरबंद

बॅटरी चोरणारी टोळी संग्रामपुरात जेरबंद

संग्रामपूर ( बुलडाणा ) : मोबाइल टॉवरवरील बॅटरी चोरणार्‍या मध्यप्रदेशातील खरगोन जिल्हय़ातील टोळीतील ५ आरोपींपैकी २ आरोपींना आयशर कंपनीच्या एमएच 0४ डीडी ११५ या चारचाकी वाहनासह सोनाळा पोलिसांनी २१ नोव्हेंबरला पहाटे अटक केली.
दरम्यान, त्यांच्याकडून १ लाख ८ हजार रुपयांच्या १८ बॅटर्‍यांसह चारचाकी वाहनही पोलिसांनी जप्त केले आहे. ठाणेदार सचिनसिंह परदेशी, पोलीस उपनिरीक्षक जोशी, रायटर श्याम कपले यांनी ही कारवाई केली. कारवाईदरम्यान दोन जणांना अटक करण्यात आली तर तीन जण फरार होण्यात यशस्वी झाले. जामोद परिसरात ही कारवाई करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्यामध्ये वाहनाचा चालक आपसिंग दशरथ डावल (३२), विजय रामसिंग बडोले (वय २५ दोघे. रा. जुना पाणी बडवा, जि. खरगोन मध्यप्रदेश) यांचा समावेश आहे.
रात्र गस्तीदरम्यान लाडणापूर, जामोद भागात चोरी होत असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाकडून सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार परदेशी यांना मिळाली होती. तसेच लाडणापूर येथील ग्रामस्थांनी परदेशी यांनाही भ्रमणध्वनीद्वारे, लाडणापूर गावाजवळील मोबाइल टॉवर जवळची बॅटरी चोरी केली जात असल्याची माहिती दिली होती. दरम्यान, चोरीचा प्रयत्न होत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आल्याचे चोरट्यांना समजताच त्यांनी तेथून काठता पाय घेतला. त्यामुळे ठाणेदार परदेशी यांनी लाडणापूरकडून जळगाव जामोदकडे जाणार्‍या रस्त्यावर नाकाबंदी केली असता त्यांना उपरोक्त आयशर गाडीचा चालक संशयास्पद स्थितीत जामोद येथे मिळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत बॅटरी चोरणारा असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. सोबतच पोलिसी खाक्या दाखवताच सहकारी शेतात पळाले असल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र साळुंके व जळगाव जामोदचे ठाणेदार विजय पाटकर यांच्या मदतीने ठिकठिकाणी नाकाबंदी करून आणखी एका आरोपीस करमोडा ते लाडणापूर रस्त्यावरील एका झोपडीजवळ अटक करण्यात आली. सोनाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Battery stealing gang Sangramapura militant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.