१0८ क्रमांकाचा रुग्णांना आधार
By Admin | Updated: October 21, 2014 23:00 IST2014-10-21T23:00:18+5:302014-10-21T23:00:18+5:30
खामगाव तालुक्यातील ५७५ रुग्णांना मिळाला अत्याधुनिक सुविधेचा लाभ.

१0८ क्रमांकाचा रुग्णांना आधार
खामगाव (बुलडाणा): शासनाच्या भारत विकास आरोग्य कार्यक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेल्या १0८ या रुग्णवाहिका सेवेने गेल्या सहा महिन्यांमध्ये तालुक्यातील ५७५ अत्यवस्थ रुग्णांना सेवा दिली आहे. वेळीच रुग्णांची सोय होत असल्याने ही योजना जीवनदायी ठरत आहे.
आपत्कालीन वैद्यकीय सेवा तत्काळ व घटनास्थळीच उपलब्ध व्हावी. याकरिता शासनाने १0८ कं्रमाकांच्या रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. राज्यात अशा प्रकारच्या ९३७ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. ३0 किमी अंतरावरील क्षेत्रात एक रुग्णवाहिका दिली आहे. खामगाव तालुक्यातील रोहणा प्राथमिक आरोग्य केंद्र, लाखनवाडा ग्रामीण रुग्णालय व खामगावातील सामान्य रुग्णालय येथे या रुग्णवाहिका २४ तास रुग्णसेवेसाठी तत्पर आहेत. रस्ते अपघात, नैसर्गिक आपत्ती, मनुष्यनिर्मित आपत्ती, अत्यवस्थ रुग्ण, सिरियस, गरोदर माता, गंभीर बालके, सर्पदंश, विषप्राशन तसेच जळीत रुग्ण यांना तत्काळ वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी ही रुग्णवाहिका सेवा आहे.
१0८ या क्रमांकावर दूरध्वनी केल्यास नजीक उपलब्ध असलेली या सेवेतील रुग्णवाहिका तत्काळ उपलब्ध केली जाते. खामगाव शहरासह तालुक्यात ३ रु ग्णवाहिका कार्यरत असून, एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीमध्ये ५७५ रुग्णांना १0८ ची तत्काळ सेवा मिळाली आहे. या रुग्णवाहिकेमध्ये अत्यवस्थ रुग्णावर उपचार करणारी अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रुग्णवाहिकेसोबत २४ तास डॉक्टरही उपलब्ध आहेत.