जनुना येथे बॅनर फाडले, गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2016 01:54 IST2016-04-16T01:54:34+5:302016-04-16T01:54:34+5:30

अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला.

Banners at Januna, filed a complaint | जनुना येथे बॅनर फाडले, गुन्हा दाखल

जनुना येथे बॅनर फाडले, गुन्हा दाखल

जनुना (जि. बुलडाणा): डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र व संदेश असलेले बॅनर फाडल्याने येथे १५ एप्रिल रोजी तणाव निर्माण झाला होता. शिवाजीनगर पोलिसांनी तत्परता दाखवत समजूत घालून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त येथील बस स्थानक परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र व संदेश देणारे बॅनर पंचशील नवयुवक क्रीडा मंडळाने लावले हो ते. अज्ञात इसमाने १४ एप्रिलला रात्री बॅनर फाडले. सदरची घटना १५ एप्रिल रोजी सकाळी समाजबांधवांच्या लक्षात येताच त्यांनी निदर्शने व रास्ता रोको केला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Banners at Januna, filed a complaint