शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदार शेतकऱ्यांच्या मालमत्तेवर बँकाचा डोळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 17:44 IST

राष्ट्रीयीकृत बँकांनी अनेक थकबाकीदार शेतकºयांना नोटीस पाठवून बँकेस तारण दिलेल्या मालमत्तेचा ताबा घेण्याचा इशारा दिला आहे.

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा: शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज मिळावे, त्यांच्या अडचणी दूर व्हाव्या, यासाठी गावोगावी पीक कर्ज मेळावे घेण्यात येत आहेत. तर दुसरीकडे पीक कर्ज देणे सोडुन बँकाकडून शेतकºयांकडे कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. काही राष्ट्रीयीकृत बँकांनी अनेक थकबाकीदार शेतकºयांना नोटीस पाठवून बँकेस तारण दिलेल्या मालमत्तेचा ताबा घेण्याचा इशारा दिला आहे. दुष्काळ व खरीप पेरणीच्या तोंडावर थकबाकीदार शेतकºयांच्या मालमत्तेवर बँकांचा डोळा असल्याने शेतकरी अडचणी सापडले आहेत. खरीप हंगामासाठी लागणाºया खत, बियाण्यांचा खर्च पीक कर्जाच्या भरवश्यावरच केला जातो. पेरणीसाठी जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांची भीस्त ही बँकेकडून मिळणाºया पीक कर्जावर असते. जिल्ह्यात यंदा ३ लाख ३४ हजार शेतकºयांना १ हजार ७७३ कोटी ७७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. दरम्यान, गेल्या दोन महिन्यापासून पीक कर्ज वाटपास सुरूवात झाली आहे. परंतू अद्यापही अनेक शेतकरी पीक कर्जापासून वंचीतच आहेत. पीक कर्जासाठी शेतकºयांना अडचणी येऊ नये, यासाठी प्रशासनाकडून पीक कर्ज मेळावे घेतले जात आहेत. तसेच प्रत्येक १५ दिवसाआड एकदा पीक कर्ज वाटपाचा आढावा यंत्रणेकडून घेतला जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत अवघ्या ५ टक्क्यापर्यंतच पीक कर्ज वाटप झाल्याची माहिती आहे.  गत वर्षी ३४.१५ टक्के पीक कर्ज वाटप संपूर्ण हंगामात झाले होते. त्यामुळे यंदा पीक कर्जाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासकीय पातळीवरुन जोरदार प्रयत्न होत असतानाच दुसरीकडे बँकाकडून शेतकºयांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू असल्याची ओरड शेतकºयांमधून होत आहे. बँकेने पीक कर्ज वाटप करून शेतकºयांना दुष्काळात धीर देण्याऐवजी त्यांच्यावर वसुलीचा तगादा लावल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहेत. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेसह जिल्ह्यातील काही बँकांनी थकबाकीदार शेतकºयांना नोटीस पाठवूण कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

 शेतकऱ्यांना दिली २५ जूनची ‘डेडलाईन’दुष्काळ व पेरणीसाठी खत, बियाण्यांची जुळवाजुळव करण्याचे दिवस असताना शेतकºयांना बँकेकडून थकबाकी रक्कम भरण्यासाठी नोटीस पाठविण्यात आलेल्या आहेत. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने थकबाकी रक्कम भरण्यासाठी शेतकºयांना २५ जूनची डेडलाईन दिली आहे. कर्जाची रक्कम भरण्यास दिरंगाई झाल्यास बँकेस तारण दिलेल्या मालमत्तेचा बँकेस ताबा घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल, असे निर्देश विदर्भ कोकण ग्रामीण बँक मेहकर शाखेच्या वरिष्ठ शाखा प्रबंधकांनी दिले आहेत. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरीbankबँक