जिल्हा समन्वयकाकडून बँक व्यवस्थापकाची चौकशी

By Admin | Updated: July 2, 2014 23:46 IST2014-07-02T23:26:25+5:302014-07-02T23:46:12+5:30

मोताळा स्टेट बँकेतील खातेदारांनी केलेल्या तक्रारींची नोंद; बँक व्यवस्थापकाची चौकशी.

Bank Manager's inquiry by the District Coordinator | जिल्हा समन्वयकाकडून बँक व्यवस्थापकाची चौकशी

जिल्हा समन्वयकाकडून बँक व्यवस्थापकाची चौकशी

मोताळा : येथील स्टेट बँकेचे व्यवस्थापक यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून व बँकेत असलेल्या अपुर्‍या सुविद्यांबाबत खासदार प्रतापराव जाधव यांच्यामार्फत खातेदारांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत जिल्हा समन्वयक यांनी स्वत: तक्रारदारांची भेट घेवून २८ जून रोजी बँकेच्या कामकाजाची चौकशी केली.
येथील स्टेट बँकेचे व्यवस्थापक अरूणकुमार चौधरी यांच्या कारभाराला कंटाळून परिसरातील अनेक गावातील संरपंच, उपसरपंचासह खातेदारांनी बर्‍याच दिवसांपासून विभागीय कार्यालयाकडे तक्रारी दाखल केलेल्या होत्या. बँकेतील कर्मचार्‍यांची अपुरी संख्या, कर्मचार्‍यांची खातेदारशी असभ्यपणाची वागणुक, कर्ज देतांना जाणीवपूर्वक कागदपत्रांचा त्रास, बर्‍याच वेळा विविध कामांसाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना रांगेत तासतास उभे राहावे लागत होते, शासकीय अनुदानातून सक्तीने कर्ज कपात, आदेश असतांनाही शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठी टाळाटाळ, एटीएम मशीन सतत बंद, नेट कनेक्टीविटीची सबब पुढे करून व्यवहार ठप्प ठेवणे आदीं समस्यांचा समावेश तक्रारीत होता.
या सर्व मुद्यांवर तक्रारकर्ते गजानन बोदडे, अमोल पाटील, गजानन मामलकर, शे.सलीम शे.याकुब, गजानन सोळंके, सुरेश भिडे, रविंद्र राऊत, पंकज वराडे, विलास सुरगडे, दिनेश चित्रंग यांनी चौकाशी दरम्यान जिल्हा समन्वयक राजेंद्र परब यांच्याकडे लेखी जबाब नोंदविले व बँक व्यवस्थापक चौधरी यांची तत्काळ बदली करण्याची आग्रही मागणी केली. मागणी पुर्ण न झाल्यास बँकेसमोर डफडे बजाव आंदोलन करण्याचा इशारासुद्धा तक्रारकर्त्यांनी चौकशी अधिकर्‍यांना दिला.दरम्यान बँकेतील वाढती गर्दी पाहता ग्रामपंचायत प्रशासनाने २८ जून रोजी मासिक सभेमध्ये स्टेट बँकेत शेतकर्‍यांसाठी स्वतंत्र कृषी विकास शाखा स्थापन करण्याचा ठराव एममताने पारीत केला.

Web Title: Bank Manager's inquiry by the District Coordinator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.