शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

मुंबई येथील बँक मॅनेजरच्या अपहरणाचा डाव फसला, एक आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2018 10:50 IST

मुंबई येथील एका बँक व्यवस्थापकाचे अपहरण करणा-या एका आरोपीस कारसह डोगणाव पोलिसांनी १६ जून रोजी रात्री ८.३० वाजता ताब्यात घेतले. या प्रकरणील तीन आरोपी फरार असून पोलिस त्यांच्या शोध घेत आहेत.

डोणगाव -  मुंबई येथील एका बँक व्यवस्थापकाचे अपहरण करणा-या एका आरोपीस कारसह डोगणाव पोलिसांनी १६ जून रोजी रात्री ८.३० वाजता ताब्यात घेतले. या प्रकरणील तीन आरोपी फरार असून पोलिस त्यांच्या शोध घेत आहेत. या प्रकरणामागे मुंबई परिसरात मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तींचे अपहरण करणारे रॅकेट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.मुळचे उत्तरप्रदेशातील परंतु नोकरीनिमित्त मुंबई येथे राहणारे डीसीबी बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक राजेशकुमार फुलचंद मोर्या हे १५ जून रोजी रात्री ९ वाजता आपल्या मांडा टिटवाळा वेस्ट येथील घरी जात असताना पांढ-या रंगाच्या एमएच ०४-जीडी ७९१२ या क्रमांकाच्या  स्विफ्ट कारमधून आलेल्या ४ व्यक्तींनी त्यांना पकडून कारमध्ये टाकले व कसारा येथे मद्रासी बोलणारे देवेंद्र व कालिसा असे दोन व्यक्ती उतरले. त्यानंतर याठिकाणी पुन्हा एका आरोपी कारमध्ये बसला. त्यानंतर कार १६ जून रोजी दुपारी २ वाजेदरम्यान मेहकर परिसरात आणल्यानंतर डोणगाव येथे वाहतुकीची कोंडी झाल्याने बँक सहाय्यक व्यवस्थापक राजेशकुमार मोर्या हे कारचा दरवाजा उघडून पळाले.त्यानंतर रस्त्यावर असणा-या डोणगाव पोलिस स्टेशन गाठून संपूर्ण अपहरणाची माहिती दिली. यावेळी एएसआय अशोक नरोटे यांनी ठाणेदार अमोल माळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहका-यांसह कारचा पाठलाग केला. तसेच अपहरणाची माहिती बुलडाणा, अकोला व वाशिम कंट्रोल रूमला माहिती दिली.  दरम्यान कार चालकाने कार परत मेहकरकडे वळविल्याने मेहकर पोलिसांच्या सहकार्याने सदर कार आरोपी चालकांसह ताब्यात घेतली. या प्रकरणातील तीन आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.अपहरण करणारे रॅकेट असल्याची शक्यताज्या कारमधून  राजेशकुमार मोर्या यांचे अपहरण केले गेले, त्या कारमधील लोकांना आप कहॉ तक है, असे विचारणा करणारे फोन दर १५ मिनिटाला येत होते. यापूर्वीही मुंबई व इतर परिसरातून अनेक व्यक्तींचे अपहरण झालेले असून त्यामागे मोठ्या पदावर असणा-या व्यक्तीचे अपहरण करणारे राज्यातील मोठे रॅकेट असल्याची शक्यता आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिस