कर्जफेडीसाठी बँकांचा तगादा!
By Admin | Updated: May 4, 2015 01:16 IST2015-05-04T01:16:48+5:302015-05-04T01:16:48+5:30
कोट्यवधीचे सोने बँकांकडे गहाण; बँकांकडून वसुलीसाठी नोटीस, शेतकरी चिंतातुर.

कर्जफेडीसाठी बँकांचा तगादा!
अनिल गवई/ खामगाव : सुवर्ण तारण योजनेंतर्गत शेतकर्यांनी कोट्यवधी रुपयांचे सोने बँकांकडे ह्यगहानह्ण ठेवले आहे. बँकांच्या नियमानुसार कर्जफेडीची मुदत संपलेल्या शेतकर्यांना नोटीस पाठवून बँकाकडून वसुलीसाठी ह्यतगादाह्ण सुरू आहे. सततच्या नापिकीने मेटाकुटीस आलेल्या बळीराजा आता बँकांच्या या तगाद्यात चिंताग्रस्त झाला आहे. सन २00९ साली तत्कालीन राज्य शासनाने संपूर्ण कर्ज माफी दिली. त्यानंतर सन २0१0 पासून शेतकर्यांसाठी नवीन कर्जपुरवठा सुरू केला; मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे शासनाने सन २0११ मध्ये शेतकर्यांच्या कर्जाचे पुनर्गठन केले. त्यानंतर सन २0१२ मध्ये अवकाळी पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाल्याने अनेक शेतकरी कर्जाची परतफेड करू शकले नाहीत. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील असंख्य शेतकर्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले. दरम्यानच्या कालावधीत शेतकर्यांची कर्जाच्या फेर्यातून सुटका व्हावी, शेतकर्यावरील कर्जाचे ओझे कमी व्हावे म्हणून शासनाने सन २0१0 साली सुवर्ण तारण कर्ज योजना अमलात आणली. या सुवर्ण तारण योजनेसाठी सुरुवातीला ४.३ टक्के व्याजदर आकारण्यात आले; मात्र आरबीआयने ताशेरे ओढल्यानंतर व्याजदरात वाढ करण्यात आली. आता या योजनेंतर्गत शेतकर्यांना १0.१५ टक्के व्याजाची आकारणी केली जात आहे. तथापि, चार-पाच वर्षात अवकाळी पाऊस, अतवृष्टी, दुष्काळ यामुळे शेतकर्यांनी कर्जाचा भरणा केला नाही. त्यामुळे बँक नियमानुसार तीन वर्षांपेक्षा जास्त काळ सोने बँकेत तारण राहिले व त्याच्या मूळ किमतीपेक्षा व्याजासह रक्कम शेतकर्याच्या कर्ज खात्यात नोंदविल्या गेली तर सदर सोन्याचा लिलाव करून कर्ज वसुली केली जाते. दरम्यान भारतीय स्टेट बँकेचे खामगाव येथील व्यवस्थापक अशोक सोनुने यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सुवर्णतारण कर्ज योजनेंतर्गत शेतकर्यांना सहामाही व्याज आकारणी करून कर्ज वितरित करण्यात आले. तसेच कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले. शेतकर्यांनी नियमित व्याजाचा भरणा केल्यास बँक सुविधा देते. सक्तीची वसुली केली जात नसली तरी, कर्ज माफीच्या आशेमुळे शेतकरी कर्जाचा भरणा करीत नाहीत. त्यामुळे सुवर्ण तारण योजनेतही अनेक शेतकर्यांकडे थकबाकी असल्याचे त्यांनी सांगीतले.