बँक शाखाधिका-यास जिवे मारण्याची धमकी
By Admin | Updated: March 19, 2016 00:34 IST2016-03-19T00:34:54+5:302016-03-19T00:34:54+5:30
खामगाव येथील प्रकार; गुन्हा दाखल.

बँक शाखाधिका-यास जिवे मारण्याची धमकी
खामगाव : येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखाधिकारी रॉय यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी श्याम अवथळेंनी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना १८ मार्च रोजी स्थानिक नांदुरा रोडवरील टॉवर चौकात घडली.
याबाबत महाराष्ट्र बँकेचे शाखाधिकारी महेंद्र देवचंद्र रॉय (वय ५६) यांनी शुक्रवारी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली, की १८ मार्च रोजी सकाळी ९ वाजता टॉवर चौकातून घराकडे जाण्यासाठी उभा होतो. दरम्यान, श्याम अवथळे यांनी तेथे येऊन कारण नसताना मला शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. उपरोक्त आशयाच्या तक्रारीवरुन खामगाव शहर पोलिसांनी श्याम अवथळे यांच्याविरुद्ध कलम ५0४, ५0६ भादंविनुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.