कर्जमाफीसाठी बैलजोडी रॅली

By Admin | Updated: April 14, 2017 00:15 IST2017-04-14T00:15:53+5:302017-04-14T00:15:53+5:30

सोनाळा- संघर्ष यात्रेच्या जनजागृतीकरिता सोनाळा शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने बैलगाडी रॅली १३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वा. काढण्यात आली.

Bailjodi rally for debt waiver | कर्जमाफीसाठी बैलजोडी रॅली

कर्जमाफीसाठी बैलजोडी रॅली

सोनाळा : सिंदखेडराजा येथे होऊ घातलेल्या १७ व १८ रोजी संघर्ष यात्रेच्या जनजागृतीकरिता सोनाळा शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने बैलगाडी रॅली १३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वा. काढण्यात आली.
या रॅलीची सुरुवात बसस्टॅण्डपासून करण्यात आली होती. या बैलगाडी मोर्चात जवळपास ८० बैलगाड्या शेतकऱ्यांनी स्वमर्जीने आणल्या होत्या. या रॅलीचा समारोप बसस्टॅडवर सायंकाळी ६.३० वा. करण्यात आला.
या बैलजोडी मोर्चात काँग्रेस शहर अध्यक्ष श्रीकृष्ण गावंडे, ज्येष्ठ नेते पांडव गुरुजी, समाधान मेहनकार, ग्रामपंचायत सदस्य नंदू दाभाडे, अमोल घोडेस्वार, श्रीकृष्ण वडोदे, सोनाजी वाघोडे, महादेव गवंडी, राजेंद्र दाभाडे, पांडुरंग वेरूळकार, प्रशांत गावंडे, माजी उपसरपंच गणी भाई, राहुल खुमकर, प्रकाश देशमुख, देवीदास तारू आदींसह २०० काँग्रेस कार्यकर्ते हजर होते.

Web Title: Bailjodi rally for debt waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.