बहुजन मुक्ती पार्टीचे ‘बजेट जलाओ’ आंदोलन

By Admin | Updated: March 27, 2015 01:40 IST2015-03-27T01:40:58+5:302015-03-27T01:40:58+5:30

ओबीसी व एमबीसीसाठी कोणत्याही तरतुदी न केल्याचा आरोप.

Bahujan Mukti Party's 'Burn the Budget' movement | बहुजन मुक्ती पार्टीचे ‘बजेट जलाओ’ आंदोलन

बहुजन मुक्ती पार्टीचे ‘बजेट जलाओ’ आंदोलन

बुलडाणा: केंद्र शासनाच्या धोरणाच्या विरोधात तसेच १६ मार्चच्या केंद्रीय बजेटमध्ये सामान्य नागरिकांसाठी तसेच ओबीसी व एमबीसीसाठी कोणत्याही तरतुदी न केल्याचा आरोप करून बहुजन मुक्ती पार्टीच्यावतीने २६ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे ह्यबजेट जलाओह्ण आंदोलन करण्यात आले. बजेटमध्ये मूलनिवासी बहुजन समाजाचा कुठलाही विचार न करता केवळ भांडवलदार व विदेशी कंपन्यांचाच विचार केला गेला, असा आरोप करून यावेळी केंद्रीय बजेटचा निषेध करण्यात आला. यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष मनोज ठाकरे, प्रशांत सोनुने, नारायण काळे, मिलिंद गव्हाळे, अमोल ससाने, महेंद्र गवई, के.ओ.बावस्कर, सतीश पंडित, रमेश खरे, संदीप पाचोर, दीपाली इंगळे, प्रा.सुमित्रा बोर्डे, दीपाली जाधव, चव्हाण मॅडम, सौरभ जुमडे, श्रीकृष्ण धुरंधर, अजय जाधव, सागर ठोंबरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: Bahujan Mukti Party's 'Burn the Budget' movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.