सराफा दुकानातून २७ लाखांचा ऐवज असलेली बॅग पळवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 03:24 PM2019-12-10T15:24:23+5:302019-12-10T15:24:30+5:30

दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका दहा ते १२ वर्ष वयाच्या मुलाने दुकानातून ही काळ््या रंगाची सोने असलेली बॅग पळवली.

A bag contains gold worth 27 lakh stolen from Jwelary shop | सराफा दुकानातून २७ लाखांचा ऐवज असलेली बॅग पळवली

सराफा दुकानातून २७ लाखांचा ऐवज असलेली बॅग पळवली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा: शहरातील मुख्य बाजार पेठेतून सुमारे २७ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागीने आणि रोख रक्कम असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना नऊ डिसेंबर रोजी सकाळी पावणे दहाच्या सुमारास घडली. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
भरदिवसा सिंदखेडराजा शहरातील मुख्य बाजारपेठेतील व्यापारी लाईनमध्ये ही घटना घडल्याने व्यापाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. दरम्यान पोलिसांनी या घटनेनंतर परिसरात तातडीने नाकाबंदी केली. मात्र तोवर अज्ञात चोरटे दुचाकीवर पसरा झाल्यो सीसीटीव्ही फुटेज तपासण्यानंतर स्पष्ट झाले. सिंदखेड राजातील सराफा व्यापारी प्रदीप केशव इवरकर हे नेहमीप्रमाणे त्यांच्या कृष्णा ज्वेलर्स या दुकानात सोमवारी दुपारी दाखल झाले. दरमयान दुकानाचे एक शटर उघडून त्यांनी त्यांच्याकडील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असलेली काळ््या व पांढºया रंगाच्या दोन्ही बॅग दुकानातील काचेच्या काऊंटवर ठेवत दुकानाचे दुसरे शटर उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात माचीसच्या काड्या व फेवीक्वीक टाकण्यात आले असल्याने त्यांना हे कुलूप उघडण्यास वेळ लागला. याच दरम्यान अज्ञात चोरट्यांने त्यांच्या दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असलेली काळ््या रंगाची लेदरची बॅग लंपास केली. कुलूप उघडत असताना बॅगची आठवण झाल्याने त्यांनी दुकानात बघितले असता काळ््या रंगाची लेदरची बॅग तेथे आढळून आली नाही. त्यामुळे त्यांनी आरडा ओरड करत मदत मागितली.
दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका दहा ते १२ वर्ष वयाच्या मुलाने दुकानातून ही काळ््या रंगाची सोने असलेली बॅग पळवली. सोबतच सिंदखे राजा-मेहकर मार्गावर काही अंतरावर दुचाकीवर थांबलेल्या दोन अनोळखी व्यक्तींना बॅग देत त्यांच्यासोबत तो अल्पवयीन मुलगाही तेथून पसरा झाला. चोरट्यांनी बॅग उचलल्यानंतर ती बेडसीटने झाकून पळवितांनाचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. या घटनेनंतर प्रदीप केशवराव इवरकर यांची प्रकृती बिघडली होती. या घटनेत चोरट्यांनी २२ लाख २३ हजार रुपयांचे ६३६ ग्रॅम सोने व चांदीचे दोन लाख ३५ हजार ७५ रुपयांचा मुद्देमाल आणि दोन लाख ५१ हजार रुपयांची रोख रक्कम असा २७ लाख नऊ हजार ७५ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. सध्या पोलिस आरोपींचा शोध घेत आहे. 

कुलपात फेवीक्वीक व माचिसच्या काड्या
अज्ञात चोरट्यांचा चोरीचा हा प्लॅन पूर्व नियोजित असल्याची शक्यता असून त्यांनी या चोरीसाठी आधी रेकी केली असल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे सराफा व्यापाºयाच्या दुकानाच्या एका शटरच्या कुलूपामध्ये फेवीक्वीक आणि माचिसच्या काड्या टाकण्यात आल्या होत्या. त्यामुळे हे कुलूप उघडताना व्यापाºयास विलंब झाला. त्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांचे इप्सीत साध्य केले अशी चर्चा आहे.

 

Web Title: A bag contains gold worth 27 lakh stolen from Jwelary shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.