अँसिड पडल्याने बालकाचा मृत्यू
By Admin | Updated: October 29, 2014 22:42 IST2014-10-29T22:42:46+5:302014-10-29T22:42:46+5:30
जळगाव जामोद येथील घटना.

अँसिड पडल्याने बालकाचा मृत्यू
खामगाव (बुलडाणा) : अँसिड अंगावर पडल्याने जळून सात वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना काल सायंकाळी जळगाव जामोद येथे घडली. जळगाव जामोद येथील जितेंद्र प्रेम शिंदे (७) या बालकाच्या अंगावर अँसिड पडल्यामुळे त्याला काल सायंकाळी ५:३0 वाजता येथील सामान्य रूग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.