काेराेनामुक्त संकल्प रथातून जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:36 IST2021-05-07T04:36:36+5:302021-05-07T04:36:36+5:30

धाड : काेराेना या संसर्गजन्य आजाराचा राज्यात तसेच बुलडाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ...

Awareness from Kareena Mukta Sankalp Rath | काेराेनामुक्त संकल्प रथातून जनजागृती

काेराेनामुक्त संकल्प रथातून जनजागृती

धाड : काेराेना या संसर्गजन्य आजाराचा राज्यात तसेच बुलडाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेल बुलडाणा मनाेज दांडगे यांनी साथीच्या रोगाचा भविष्यात उद्रेक होणार नाही, यादृष्टीने जिल्हा पातळी विशेषतः मासरूळ जिल्हा परिषद सर्कलमध्ये जनजागृती अभियान सुरू केले आहे. कोरोनामुक्त संकल्प रथाचे उद्घाटन त्यांनी बुधवारी केले.

हा रथ गावागावांत फिरून काेराेनाविषयी जनजागृती करणार आहे. मनाेज दांडगे यांच्या वतीने मास्कचे वाटप करण्यात येणार आहे. यावेळी धामणगावे सरपंच दिलीप सुरडकर, माजी सरपंच डी.एन. सपकाळ, राष्ट्रवादीचे नेते गणेश नरवाडे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तालुका उपाध्यक्षा निर्मला तायडे, साहेबराव पाटील, गुलाबराव पाटील, शरदराव पाटील, प्रकाश पाटील, भीमराव पायघन, राजू अपार, संतोष इंगळे, अमोल तबडे, राहुल बोडखे, समाधान शिंदे, दांडगे स्कूलचे प्राचार्य डवले आदींसह इतर उपस्थित हाेते. कोरोनामुक्त संकल्परथाच्या उद्घाटनप्रसंगी मनोज दांडगे यांनी धामणगाव येथील नागरिकांना काेराेनाविषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

Web Title: Awareness from Kareena Mukta Sankalp Rath