पाडळी परिसरात काेराेनाविषयक जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:31 IST2021-04-26T04:31:02+5:302021-04-26T04:31:02+5:30
आरोग्य केंद्राचे कर्मचारी, डॉक्टर व गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य हे गावात फिरून पॉझिटिव्ह असलेल्या लोकांच्या घरी ...

पाडळी परिसरात काेराेनाविषयक जनजागृती
आरोग्य केंद्राचे कर्मचारी, डॉक्टर व गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य हे गावात फिरून पॉझिटिव्ह असलेल्या लोकांच्या घरी जाऊन त्यांना कोराेना संसर्ग रोगाबद्दल मार्गदर्शन करीत आहेत़ तसेच त्यांचे विलगीकरण करून यांना वेगळे राहण्याविषयी सूचना देत आहेत़ मासरूळ गावात बरेच रुग्ण पॉझिटिव्ह असल्यामुळे इतरांनाही त्याची लागण होत असल्याचे चित्र आहे़ गावातील कंटेनमेंट झोनमध्ये सॅनिटायजरची फवारणी करून आरोग्य विभागाचे कर्मचारी व ग्रामपंचायत प्रशासन मार्गदर्शन करीत आहेत. आरोग्य विभागाच्या स्तरावरून रुग्णालयात उपचार सुरू असताना ग्रामीण भागात कोराेना संसर्ग वाढत आहे़ कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वसामान्याच्या मनात चांगलीच धडकी भरली आहे़ पंचायत समिती सदस्य, सरपंच यांनी तत्काळ आरोग्य विभागास गावात रुग्ण वाढत असल्याची माहिती दिली़ या माहितीच्या आधारे २४ एप्रिल राेजी पंचायत समितीचे पथक मासरुळ गावात दाखल झाले़ त्यांनी रॅपिड टेस्टचे विशेष शिबिर घेतले़ यामध्ये पाॅझिटिव्ह आलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले़ गृह विलगीकरणात असलेले काही पाॅझिटिव्ह रुग्ण गावात फिरत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे़ सकाळी होणाऱ्या गर्दीला आळा घालावा, असे आवाहन पंचायत समिती सदस्य दिलीप सिनकर, शेषराव किसन सावळे, माजी सरपंच शकुंतलाबाई महाले, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर देशमुख, किरण उगले, मधुकर महाले, हरिभाऊ शिणकर ,पंडित सावळे ,सुभाष पवार, जुलालराव देशमुख, मधुकर शिणकर ,अशोक काळे ,डी़ जे़ पवार,पोलीस पाटील हिम्मतवार, वैद्यकीय अधिकारी डॉ़ सरकटे ,समुदाय आरोग्य अधिकारी डॉ़ इंगळे, आरोग्यसेवक नितीन गायकवाड,आरोग्यसेवक आशा सुरडकर, कविता कापडी ,रेखा गायकवाड, वंदना शिंदे , अरुण सपकाळ आदींसह इतरांनी केले आहे़