‘चिखली अर्बन’ पुरस्कारने सन्मानित
By Admin | Updated: June 13, 2017 00:10 IST2017-06-13T00:10:32+5:302017-06-13T00:10:32+5:30
चिखली : सहकाराच्या माध्यमातून आधुनिक व जलद बँकिंगची सेवा ग्राहकांना देणाऱ्या दि चिखली अर्बन को-आॅप. बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

‘चिखली अर्बन’ पुरस्कारने सन्मानित
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : सहकाराच्या माध्यमातून आधुनिक व जलद बँकिंगची सेवा ग्राहकांना देणाऱ्या दि चिखली अर्बन को-आॅप. बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. सन २०१६ या आर्थिक वर्षातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल विदर्भ अर्बन बँक्स को-आॅप असोसिएशनद्वारे तृतीय पुरस्काराची मानकरी चिखली अर्बन बँक ठरली असून, १० जून रोजी नागपूर येथे झालेल्या समारंभात बँकेला सन्मानित करण्यात आले आहे.
आर्थिक वर्ष ३१ मार्च २०१६ रोजी ५०० कोटींपेक्षा जास्त ठेवी असलेल्या बँकेच्या गटातून आर्थिक कामगिरीचा विचार हा पुरस्कार देताना केला जातो. गेल्या आर्थिक वर्षात चिखली अर्बन बँकेने विविध प्रकारच्या ठेवी, वेगवेगळी कर्जे आणि निव्वळ नफ्यात घसघशीत वाढ केली. पारदर्शी कारभार, उत्तम प्रशासन व तत्पर सेवा या वैशिष्ट्यांची पुरस्कार समितीने आवर्जून दखल घेतली होती. त्यानुसार विदर्भ अर्बन बँक्स को-आॅप. असोसिएशनने आयोजित केलेल्या समारंभात आमदार चैनसुख संचेती, असोसिएशनचे अध्यक्ष कैलासचंद्र अग्रवाल, संचालक विठ्ठलदास डागा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दि चिखली अर्बन को-आॅप. बँकेचे उपाध्यक्ष डॉ.गणेश खांडेभराड, संचालक पुरूषोत्तम दिवटे, राजेंद्र शेटे, नरेंद्र लढ्ढा व सरव्यवस्थापक संजय भंगिरे यांनी हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते स्वीकारला. चिखली अर्बन बँकेच्या या चमकदार कामगिरीबद्दल बँकेचे ग्राहक, खातेदार, भागधारक व हितचिंतकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.