तेरवीचा खर्च टाळून गावासाठी दिली विंधन विहीर
By Admin | Updated: July 15, 2015 00:58 IST2015-07-15T00:58:30+5:302015-07-15T00:58:30+5:30
मलकापूर तालुक्यातील शिरढोण येथील नारखेडे परिवाराचा अभिनव पायंडा.

तेरवीचा खर्च टाळून गावासाठी दिली विंधन विहीर
सुनील देशमुख / दाताळा (जि. बुलडाणा) : मलकापूर तालुक्यातील ग्राम शिराढोण येथील सरपंच संदीप नारखेडे यांनी आपल्या आईच्या तेरवीचा खर्च टाळून गावासाठी विधिंन विहिरीचा खर्च देण्याचा अभिनव पायंडा पाडला आहे.
शिरढोण गावातील पाणी समस्या सोडविण्यासाठी सरपंच संदीप नारखेडे हे नेहमची प्रयत्नशिल असतात त्यांच्या आई स्व.सौ.विजया नारायण नारखेडे यांचे नुकतेच २ जुलैला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यावेळी त्यांच्या मागे पती नारायण मोतीराम नारखेडे तसेच मुले प्रमोद नारखेडे, प्रदीप नारखेडे, दिलीप नारखेडे, संदीप नारखेडे (सरपंच) हे आहेत.
स्व.सौ.विजया नारखेडे यांची तेरवी १४ जुलै रोजी ठरली होती. या तेरवीचा खर्च टाळून आपल्या परिवाराकडून गावासाठी विंधनविहिर खोदून देण्याचा निर्णय नारखेडे परिवाराने घेतला व ग्रामपंचायतला या साठी रोख ४१ हजार रूपये दिले. यावेळी ग्रामपंचायत सचिव एस.पी. राठोड, उपसरपंच रविंद्र पाटील तसेच किर्तनकार हभप सुरेश महाराज शिराढोणकर उपस्थित होते. याप्रसंगी हभप सुरेश महाराज यांनी समाजात अशाच सामाजिक व विधायक कामांचा इतरांनीही आदर्श घ्याव असे आवाहन केले. यावेळी गावातील ग्रामपंचायत सदस्य, प्रफुल्ल पाटील, सुमती नाफडे, प्रविण नाफडे, सिमा वराडे, मुक्ताबाई इखारे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.