पावसाने गाठली सरासरी

By Admin | Updated: June 22, 2015 02:04 IST2015-06-22T02:04:14+5:302015-06-22T02:04:14+5:30

दमदार पावसाची अपेक्षा; २१ दिवसांत पडला बुलडाणा जिल्ह्यात १२२८.१ मि.मी. पाऊस.

Average reached by rain | पावसाने गाठली सरासरी

पावसाने गाठली सरासरी

बुलडाणा : पूर्वहंगामी व मॉन्सूनच्या पावसामध्ये सातत्य नसले तरी या पावसाने १ ते २१ जून दरम्यान अपेक्षित ९९.१ मि.मी. सरासरी गाठण्याचा प्रयत्न केला. २१ तारखेपयर्ंत १२२८.१ मि.मी. अशी पावसाची नोंद आहे. सरासरी ९५.३ मिं.मी. पाऊस अपेक्षित असताना ९४.५ मि.मी. पावसाची नोंद झाली, तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत जूनमध्ये १३.३ टक्के पाऊस पडला आहे.शासनद्वारा प्रत्येक महसूल मंडळ स्तरावर पर्जन्यमापक यंत्रे बसविण्यात आली आहेत.
दररोज सकाळी ८ वाजता अगोदरच्या २४ तासांत पडलेल्या पावसाची नोंद या ठिकाणी घेतली जाते. जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या पावसाच्या दिवसांत सरासरी ७१२.७ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात १२२८.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक सरासरी पावसाच्या तुलनेत हे प्रमाण १३.३ टक्के आहे.
शुक्रवार ते शनिवार सकाळपर्यंंत जिल्ह्यात ५४.0 मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक ३९.0 मि.मी. पाऊस खामगाव तालुक्यात पडल्याची नोंद झाली आहे. त्यानंतर मलकापूर २.0, मोताळा ६.0, नांदुरा ४.0 व शेगाव तालुक्यात ३.0 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. इतर तालुक्यांमध्ये पाऊस झाला नाही.जिल्ह्यात १ जून ते २१ जून पर्यंत सरासरी ९४.५ मिमी. पाऊस झाला.
शनिवार ते रविवार सकाळपर्यंंत संपूर्ण जिल्ह्यात पावसाचा एक थेंबही पडला नाही. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या असून, शेतकर्‍यांमध्ये चिंता वाढली आहे. सार्वत्रिक पावसाची गरज असून अद्याप जिल्ह्यातील काही तालुक्यात पुरेसा पाऊस झाला नाही.

Web Title: Average reached by rain