सरासरी ६0 टक्के
By Admin | Updated: October 16, 2014 00:28 IST2014-10-16T00:28:57+5:302014-10-16T00:28:57+5:30
मेहकर विधानसभा मतदारसंघातील १९ उमेदवारांचे भविष्य मशीनबंद.

सरासरी ६0 टक्के
मेहकर : मेहकर विधानसभा मतदारसंघात १९ उमेदवारांसाठी २९६ मतदान केंद्रावर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये सरासरी ६0 टक्के मतदान झाले. २९६ केंद्रावर झालेल्या मतदान प्रक्रियेमध्ये सायंकाळी ५ वाजतापर्यंंंत सरासरी ५२ टक्के मतदारांनी म तदानाचा हक्क बजावला होता. सायंकाळी ६ वाजतापर्यंंंंत सरासरी ५९.८५ टक्के मतदान झाले. सध्या सोयाबीन सोंगणीचा हंगाम जोरात सुरु असून, मेहकर मतदार संघातील शे तकरी व शेतमजूर वर्ग आपल्या कामात व्यस्त असल्याने मतदानाच्या टक्केवारीवर याचा परिणाम जाणवला. परिसरात सोयाबीन सोंगणीचा हंगाम शेवटच्या टप्प्यात असल्याने शे तकरी व शेतमजुर सोयाबीन कापणीकरीता सकाळी ६ वाजतापासून संध्याकाळी ७ वाजता पर्यंंंत शेतात राबत आहेत. त्यात १५ ऑक्टोबर रोजी म्हणजेच मतदानाच्या दिवशी दिवसभरात ढगाळ वातावरण असल्यामुळे पावसाच्या भितीने शेतकर्यांनी शेतातील का पणी केलेल्या सोयाबीनची गंजी लावण्याला प्रथम प्राधान्य देत नंतर मतदान केल्याचे दिसून आले.
मेहकर मतदारसंघ
एकुण मतदान १,६७,३८५
महिला ७६,३११
पुरुष ९१,0७४
मतदान केंद्र २९६