शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या बंगल्यात चाेरीचा प्रयत्न; बुलढाण्यात चाेरट्यांचा हैदाेस 

By संदीप वानखेडे | Updated: June 17, 2024 17:21 IST

या प्रकरणी दाेन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीप वानखडे,बुलढाणा : शहरात गत काही दिवसांपासून चाेरट्यांचा हैदाेस सुरू आहे. चाेरट्यांची हिंमत वाढल्याने थेट जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या बंगल्यातच चाेरीचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी दाेन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुलढाणा शहरात गेल्या काही दिवसांपासून चाेरीच्या घटना वाढल्या आहेत. विष्णूवाडी येथील शासकीय बंगल्यात राहणारे न्यायाधीश ए. एम. मगरे यांच्या बंगल्यातून तस्करांनी चंदनाचे झाडच कापून नेल्याची घटना ६ मे राेजी घडली हाेती. तसेच तीन दिवस आधीच जिल्हा पोलीस मुख्यालयात बांधण्यात आलेल्या नवीन वसाहतीच्या इमारतीतून दाेन लाख ९१ हजार रुपयांचा साहित्य लंपास करण्यात आले हाेते. आता जिल्हा व सत्र न्यायाधीश खटी यांच्या बंगल्यात चोरीचा प्रयत्न अयशस्वी प्रयत्न झाला आहे़

याबाबत फिर्याद पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज रमेश गायकवाड यांनी १६ जूनला बुलढाणा शहर पाेलिसांत दिली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, त्यांची दुपारी जिल्हा व सत्र न्यायाधीश खटी यांच्या निवासस्थानी ड्यूटी सुरू असताना कोर्टाचे शिपाई शेळके यांनी आवाज दिला. यावेळी ते त्यांच्याकडे गेले तेव्हा शिपाई शेळके याने सांगितले की, दाेन महिला निवासस्थानाच्या भिंतीवरून आतमध्ये आल्या आहे. तेथे गेलो व त्या महिलांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना निवासस्थान परिसरात येण्याचे कारण विचारले असता त्याबाबतसुद्धा समाधानकारक उत्तर दिले नाही. दोन्ही महिला स्टोअर रूममध्ये काहीतरी चोरी करण्याच्या उद्देशाने आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पाेलिसांनी आरोपी आशा दिलीप लावाडकर आणि अरुणा रमेश लावाडकर (रा. माहोरा, ता. जाफ्राबाद, जि. जालना) यांच्याविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस