विवाहितेस विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:40 IST2021-07-14T04:40:09+5:302021-07-14T04:40:09+5:30
धाड : विवाहितेस विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सासरच्या पाच जणांविरुद्ध धाड पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ ...

विवाहितेस विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न
धाड : विवाहितेस विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सासरच्या पाच जणांविरुद्ध धाड पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ ही घटना १० जुलै राेजी घडली हाेती़ अत्यवस्थ असलेल्या विवाहितेवर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत़
धाड येथील फौजीया आफरीन म. नसीम या विवाहित महीलेस आरोपी खाजबी म. अलीम, म. अलिम म. अयुब, म. नदीम म. अलिम, सीमा परवीन म. नदीम, शिफा कुदुस खाँ या सासरच्या लोकांनी १० जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता दरम्यान विवाहितेस जबरदस्तीने विषारी औषधी पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला़ याप्रकरणी विवाहितेस गंभीर अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता, पोलिसांना दिलेल्या जबाबावरून सासरच्या पाच लोकांविरुद्ध पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील पाचही आरोपी फरार झाले आहेत. याप्रकरणी अधिक तपास एपीआय नीलेश अपसुंदे व कर्मचारी करीत आहेत.