एटीएम कार्ड बदलून २0 हजार पळविले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 00:51 IST2017-10-05T00:50:54+5:302017-10-05T00:51:06+5:30

नांदुरा : येथील भिमनगरातील सागर सुरेश वाकोडे (वय ३२) हे  २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास येथील सिनेमा  रोडवरील एक्सिस बँकेच्या एटीएमवर पैसे काढण्यासाठी गेले होते. 

ATM card changed to 20 thousand! | एटीएम कार्ड बदलून २0 हजार पळविले!

एटीएम कार्ड बदलून २0 हजार पळविले!

नांदुरा : येथील भिमनगरातील सागर सुरेश वाकोडे (वय ३२) हे  २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास येथील सिनेमा  रोडवरील एक्सिस बँकेच्या एटीएमवर पैसे काढण्यासाठी गेले होते. 
त्यावेळी तौफीकखान तुरलीकखान (वय २८) रा. बाबुतार  निलोरी, सागर सुंदरपूर रा.प्रतापगढ (राजस्थान) व त्याचा  सहकारी असे दोघे तेथे आले व त्यांनी सागर वाकोडे यांच्या  जवळील एटीएम कार्ड घेऊन हातचलाखीने दुसरे कार्ड दिले व  सागर वाकोडे यांच्या एटीएम कार्डच्या माध्यमातून त्यांच्या खा त्यातून २0 हजार रूपये काढले. 
ही बाब सागर वाकोडे यांच्या लक्षात आली. याबाबतची तक्रार  त्यांनी येथील पोलीस स्टेशनला दिली. यावरून पोलिसांनी  तौफीकखान तुरलीकखान यांच्या विरूध्द कलम ४२0, ३४  नुसार गुन्हा दाखल केला आहे. 
पोलिसांनी आरोपीला अटक करून गजाआड केले आहे. त्याला  न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ७ ऑक्टोबरपर्यंत  पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पुढील तपास  पोहेकाँ बोरसे करीत आहे. 

Web Title: ATM card changed to 20 thousand!