एटीएममधून १३ हजार लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 03:31 IST2017-08-07T03:31:46+5:302017-08-07T03:31:46+5:30

एटीएममधून १३ हजार लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
मोताळा: येथील भारतीय स्टेट बँक इंडिया शाखेच्या समोरील एटीएममधून अज्ञात इसमाने सेवानिवृत्त कर्मचारी गोपाल निनाजी अहिरे यांच्या बँक खात्यामधून २ आॅगस्ट रोजी १३
हजार रुपये लंपास झाल्याची घटना घडली. याबाबत त्यांनी ४ आॅगस्ट रोजी शाखा व्यवस्थापक व बोराखेडी पोलिसात तक्रार दिली आहे.
गोपाल अहिरे यांचे मोताळा एसबीआय शाखेतील बचत खात्यात पेन्शनचे १३ हजार रुपये १ आॅगस्ट रोजी आले. त्यांनी दोन वेळा रक्कम चेक करून खात्री करून घेतली. परंतु २
आॅगस्ट रोजी त्यांनी १,५०० रुपये काढले तेव्हा त्यांच्या खात्यात पेन्शनचे आलेले १३ हजार रुपये गायब झाल्याचे आढळले. या संदर्भात त्यांनी शाखाधिकारी यांना विचारल्यानंतर
सुरुवातीला त्यांनी एटीएममधून रक्कम गेल्याबाबत टोलवाटोलवी करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यानंतर अहिरे यांनी तक्रार करून सीसी फुटेज पाहून कार्यवाही करण्याची मागणी केली
आहे.