अथर्वने मोडला आठ वर्षांचा विक्रम!

By Admin | Updated: February 25, 2016 01:46 IST2016-02-25T01:46:52+5:302016-02-25T01:46:52+5:30

धनुर्विद्येत पराक्रम गाजविणा-या अर्थवचा जिल्हाधिकारी झाडे यांनी केला सत्कार.

Athrev broke the record of eight years! | अथर्वने मोडला आठ वर्षांचा विक्रम!

अथर्वने मोडला आठ वर्षांचा विक्रम!

बुलडाणा : धनुर्विद्येमध्ये पारंगत्व मिळवित अथर्व गाळणे या खेळाडूने भारतीय धनुर्विद्या संघटनेने तेलंगणा येथील विशाखापट्टणम येथे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविले. हे यश मिळविताना अथर्वने या राष्ट्रीय स्पर्धेत ३0 मीटर इव्हेंट प्रकारात सुवर्ण पदक पटकावित स्पर्धेचा मागील आठ वर्षाचा रेकॉर्ड मोडला आहे, हे विशेष. इयत्ता आठव्या वर्गात शिकणार्‍या अथर्वचे हे यश त्याच्या करिअरची सुवर्ण भरारी निश्‍चित करीत आहे. या यशाबद्दल अथर्व गाळणेचा सत्कार जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांच्याहस्ते सोमवारी करण्यात आला. त्याच्या सत्कारावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Athrev broke the record of eight years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.