विद्युत शॉक लागून मृत्यू झालेल्या कामगाराच्या कुटुंबीयांना मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:43 IST2021-07-07T04:43:20+5:302021-07-07T04:43:20+5:30
हिवराखुर्द : मेहकर तालुक्यातील हिवराखुर्द येथील रोहित्राचे काम करताना दत्तात्रय आश्रू वाकळे या खासगी कामगाराचा २९ जून रोजी विद्युत ...

विद्युत शॉक लागून मृत्यू झालेल्या कामगाराच्या कुटुंबीयांना मदत
हिवराखुर्द : मेहकर तालुक्यातील हिवराखुर्द येथील रोहित्राचे काम करताना दत्तात्रय आश्रू वाकळे या खासगी कामगाराचा २९ जून रोजी विद्युत शॉक लागल्याने मृत्यू झाला होता. याप्रकरणी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मृतकाच्या कुटुंबाला दोन लाखांची मदत मिळवून दिली.
या प्रकरणात हिवराखुर्द ग्रामपंचायतने मृतक दत्तात्रय वाकळे यांच्या कुटुंबीयांना मदत मिळवून देण्यासाठी ठराव घेऊन मोबाइल टावर बंद करण्यात आले होते. तद्नंतर संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मेहकर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष देवानंद पवार यांच्यासह गावकऱ्यांच्या सोबत चर्चा करून दत्तात्रय वाकळे यांच्या कुटुंबीयांना दोन लाखांची मदत ३ जुलै रोजी त्यांच्या घरी जाऊन दिली. याप्रसंगी मेहकर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष देवानंद पवार, सामाजिक कार्यकर्ते कृष्णा हावरे, दिलीप खरात, रवींद्र शेळके, माधव दाहिभाते, पांडुरंग ठोंबरे, विष्णू वाकळे, सुरेश वाकळे यांच्यासह गावकरी उपस्थित होते.