आर्थिक कारणावरून पत्नी, शालकावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:36 IST2021-05-27T04:36:27+5:302021-05-27T04:36:27+5:30

शेख अमीन शेख अजगर याची मुलगी तरन्नुमबानो हिचे लग्न ठरले होते. मात्र कामधंदा करण्यासाठी शेख अमिन हा पत्नी व ...

Assault on wife, Schalke for financial reasons | आर्थिक कारणावरून पत्नी, शालकावर प्राणघातक हल्ला

आर्थिक कारणावरून पत्नी, शालकावर प्राणघातक हल्ला

शेख अमीन शेख अजगर याची मुलगी तरन्नुमबानो हिचे लग्न ठरले होते. मात्र कामधंदा करण्यासाठी शेख अमिन हा पत्नी व शालक सलीम खान यांच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी करत होता. त्यातून त्यांच्यात वाद होते. २५ मे रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास अचानक शेख अमिनने विळा घेऊन पत्नी हनिफाबानो व शालक सलीमखान यांच्यावर हल्ला केला. त्यात ते दोघे जखमी झाले. तरन्नुमबानोनेही वडिलांना अडविण्याचा प्रयत्न केला असता, तिच्याही हाताला जखम झाली आहे. हा घटनाक्रम पाहून शेख अमिन याच्या तीनही मुलींनी आरडाओरड केल्याने जवळचे नागरिक मदतीसाठी धावून आले. त्यांचे आजी-आजोबाही आले. शेजाऱ्यांच्या सहकार्याने दोन्ही जखमींना बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.

याप्रकरणी तरन्नुम बानो हिने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी शेख अमिनविरोधात गुन्हा दाखल करत त्यास अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुधाकर गवारगुरू हे करत आहेत.

Web Title: Assault on wife, Schalke for financial reasons