शेतक-याने मागितली आत्महत्येची परवानगी!
By Admin | Updated: June 6, 2016 02:20 IST2016-06-06T02:20:16+5:302016-06-06T02:20:16+5:30
शासनाकडून अद्याप जमिनीचा मोबदला मिळाला नाही.

शेतक-याने मागितली आत्महत्येची परवानगी!
डोणगाव (जि. बुलडाणा): येथील ज्ञानेश्वर श्रीनिवास आखाडे यांची हिवरासाबळे येथे झालेल्या पाझर तलावामध्ये शेती गेलेली असून, अद्यापपर्यंत शासनाकडून मोबदला मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकार्यांकडे मोबदला न मिळाल्यास आत्महत्या करण्याची परवानगी द्या, अशी मागणी शुक्रवारला केली आहे.
येथील रहिवासी असलेले ज्ञानेश्वर श्रीनिवास आखाडे यांची हिवरा साबळे येथे झालेल्या पाझर तलावामध्ये 0.८१ शेती गेलेली आहे. सदर शेती २0१३ मध्ये गेली असून, अद्यापपर्यंंत शासनाकडून मोबदला न मिळाल्याने त्यांनी जिल्हाधिकार्यांकडे मोबदला न मिळाल्यास आत्महत्या करण्याची परवानगी द्या अशी मागणी केली आहे. त्यामुळे शासनाकडून मिळालेला मोबदला माझ्या कुटुंबीयांना द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. सदर शेतकर्याची शेती पाझर तलावात गेल्याने त्यांच्याकडे कोणतेही उदरनिर्वाहाचे साधन राहिले नाही. शासनाने सुमारे तीन वर्षे उलटूनही कोणताही मोबदला न दिल्याने शेतकर्याचे जगणे अवघड झाले आहे.