आशा सेविकांचे पंचायत समितीसमाेर आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:23 IST2021-06-24T04:23:46+5:302021-06-24T04:23:46+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांचा सक्तीने समावेश करण्यात आला आहे. यावेळी त्यांना नियमित सोपवलेल्या कामांच्याव्यतिरिक्तही ...

Asha Sevik's agitation in front of Panchayat Samiti | आशा सेविकांचे पंचायत समितीसमाेर आंदाेलन

आशा सेविकांचे पंचायत समितीसमाेर आंदाेलन

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांचा सक्तीने समावेश करण्यात आला आहे. यावेळी त्यांना नियमित सोपवलेल्या कामांच्याव्यतिरिक्तही कामे करावी लागत आहेत. असे असतानादेखील आशा वर्कर्स या अल्प मानधनावर काम करत आहेत. तसेच कोरोनाबाधित झालेल्या आशा सेविका व गटप्रवर्तकांना व्हेंटिलेटरसह राखीव बेड विनामूल्य उपचार करण्यात यावा, कोरोना काळात मृत्यू झालेल्या आशा सेविका व गटप्रवर्तकांच्या वारसांना पन्नास लाख रुपयांचे विमा कवच देण्यात यावे, आशा सेविका व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन त्यांना दरमहा १८ हजार रुपये व गटप्रवर्तकांना २२ हजार रुपये मानधन द्यावे, यासह इतर मागण्यांसाठी आशांचे आंदाेलन सुरू आहे़. आशा सेविकांच्या आंदाेलनाला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे़. यावेळी शेलापूरचे माजी सरपंच उमेश समाधान वाघ, उपसरपंच विनाेद सुरडक, आशा सेविका शकुंतला श्रीनाथ, नीता कुर्हाडे, स्वाती गवळी, गीता तांदुळकर, गटप्रवर्तक पुष्पा सुरडकर, अनुपमा जाधव, रेखा गायकवाड आदींसह इतर उपस्थित हाेते.

Web Title: Asha Sevik's agitation in front of Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.