शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

साखरखेर्डा परिसरात कृत्रिम पाऊस बरसला! विमानानेही मारल्या घिरट्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 21:02 IST

लोणार तालुक्यातील साखरखेर्डा आणि शेंदुर्जन मंडळात ३० आॅगस्ट रोजी कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी झाला

 सिंदखेडराजा - लोणार तालुक्यातील साखरखेर्डा आणि शेंदुर्जन मंडळात ३० आॅगस्ट रोजी कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी झाला असून परिसरातील काही गावात गावात तब्बल एक तासाहून अधिक वेळ पाऊस बरसला. यामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. दरम्यान, लोणार तालुक्यातील ही आठ गावात हा कृत्रिम पाऊस पडल्याची चर्चा आहे. या भागातही विमानाने घिरट्या घातल्याचे नागरिकाचे म्हणणे आहे.सिंदखेडराजा आणि देऊळगावराजा तालूक्यात दरवर्षी पेक्षा अल्प पाऊस झाल्याने नदी , नाले , जलयुक्त शिवारातील बंधारे, तलाव, धरणे कोरडीच असून भविष्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. दुष्काळाचा सामना करतांना शेतकरी हतबल झाला आहे. जुन, जूलै महिन्यात केवळ रिमझीम पावसाच्या भरोशावर शेतकºयांनी पेरणी केली होती. त्यावर शेतीही बहरली. परंतू गेल्या एक महिन्यापासून पावसाने चांगलीच दडी मारली होती. आकाशात काळेकुट्ट ढग जमा होत होते. परंतू ते हवेच्या झोकात पुढे निघू जात होते. मराठवाड्यातकृत्रीम पाऊस पाडण्यासाठी  औरंगाबाद येथे रडार बसविण्यात आले होते .मराठवाड्याला लागून असलेल्या सिंदखेड राजा, लोणार तालुक्यालाही दुष्काळाची झळ बसली आहे. या भागात वार्षिक सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे या भागात कृत्रिम पाऊस पाडण्यात यावा, अशी मागणी जोर धरत होती. त्यासंदर्भाने आ. डॉ. शशिकांत खेडेकर यांनी कृषीमंत्री अनिल बोंडे यांच्याकडे मागणी केली होती. त्यासाठी त्यांची आ. डॉ. खेडकरांनी प्रत्यक्ष भेटही घेतली होती. ३० जुलै रोजी याबाबतचे पत्रही त्यांना सादर केले होते.दरम्यान, तालुक्यातील स्थिती बिकट बनत होती. अशा स्थितीत ३० आॅगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा आणि शेंदुर्जन मंडळातील राताळी, शिंदी, पिंपळगाव सोनारा, दरेगाव, तांदुळवाडी, गोरेगाव, उमनगाव, काटेपांगरी, सावंगीभगत, गुंज, एकांबा, बाळसमुद्र , लिंगा, सायाळा, वडगावमाळी या गावशिवारात काळे ढग जमा झाले होते. त्याचवेळी आकाशात एक छोटे विमान घिरट्या घालत असल्याचे अनेक ग्रामस्थांच्या निदर्शनास आले आणि काही वेळातच परिसरात पाऊस सुरू झाला. त्यामुळे हा कृत्रिम पाऊस असल्याची चर्चा सुरू झाली. अनेक हौशींनी घिरट्या घालणाºया विमानाचे आपल्या मोबाईलमध्ये छायाचित्र व व्हीडीओही काढले आहेत. दरम्यान, परिसरात काही प्रमाणात पाऊस पडल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Rainपाऊसbuldhanaबुलडाणा