कलापथकाने केली कोरोना जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:32 IST2021-02-05T08:32:59+5:302021-02-05T08:32:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क देऊळगाव राजा : जिल्हा माहिती अधिकारी व जनसंपर्क कार्यालय, बुलढाणा अंतर्गत स्व. शाहीर दुर्गादास दांडगे ...

कलापथकाने केली कोरोना जनजागृती
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊळगाव राजा : जिल्हा माहिती अधिकारी व जनसंपर्क कार्यालय, बुलढाणा अंतर्गत स्व. शाहीर दुर्गादास दांडगे कला संस्था, सातगाव म्हसला यांच्या कला पथकाने देऊळगाव राजा तालुक्यात कोरोनाविषयक जनजागृती कार्यक्रम सादर केले.
तालुक्यातील अंढेरा, पाडळी शिंदे, नागणगाव, सुरा, देऊळगाव मही, धोत्रा नंदई, मेहुना राजा, टाकरखेड भागिले, वाकी खुर्द, दगडवाडी आदी गावांमध्ये जनजागृती कार्यक्रम सादर करत ग्रामस्थांना मास्क वापरा, सॅनिटायझरने हात स्वच्छ धुवा तसेच शासनाच्या इतर कल्याणकारी योजनांची माहिती सांगितली. या कला पथकात कलावंत शाहीर हरिदास खाडेभराड, शाहीर प्रमोद दांडगे, ढोलकीवादक शाहीर लक्ष्मण पालकर व सहकलाकार शाहीर पुरुषोत्तम दांडगे तसेच शाहीर ज्ञानदेव रत्नपारखी, शाहीर अरुण गिरी, लोकनर्तक रामदास बनसोडे, शाहीर ज्ञानेश्वर सानप, शिवाजी तेंजनकर, स्त्री भूमिका समाधान आव्हाड व उषा दांडगे या कलावंतांचा समावेश होता. या कार्यक्रमांना त्या-त्या गावांमधील पोलीसपाटील, सरपंच, तंटामुक्त समिती अध्यक्ष व प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते.