गणरायाचे आगमन..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 01:00 IST2017-08-26T00:59:38+5:302017-08-26T01:00:19+5:30

चिंब पावसात ढोल- ताशांच्या निनादात जिल्हय़ात श्री  गणरायाचे आगमन झाले. शुक्रवारी सायंकाळी जोरदार पाऊस  झाल्यामुळे चिंब पावसात गणेश भक्तांनी वाजत - गाजत मिरवणूक  काढत श्री गणेशाची स्थापना केली. जिल्हय़ात एकूण ९४३  सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशाची स्थापना केली असून,  यामध्ये शहरी भागात ३८५ तर ग्रामीण भागात ५५८ मंडळांनी श्री  गणेशाची स्थापना केली आहे. 

Arrival of Ganesha .. | गणरायाचे आगमन..

गणरायाचे आगमन..

ठळक मुद्देपावसामुळे गणेश उत्सवात आले चैतन्य!२४८ गावात ‘एक गाव-एक गणपती’

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा:  चिंब पावसात ढोल- ताशांच्या निनादात जिल्हय़ात श्री  गणरायाचे आगमन झाले. शुक्रवारी सायंकाळी जोरदार पाऊस  झाल्यामुळे चिंब पावसात गणेश भक्तांनी वाजत - गाजत मिरवणूक  काढत श्री गणेशाची स्थापना केली. जिल्हय़ात एकूण ९४३  सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशाची स्थापना केली असून,  यामध्ये शहरी भागात ३८५ तर ग्रामीण भागात ५५८ मंडळांनी श्री  गणेशाची स्थापना केली आहे. 
  o्री गणेशाच्या आगमनाची एका आठवड्यापासून जोरदार तयारी  सुरू होती. बुलडाणा शहरासह जिल्हय़ातील सर्व बाजारपेठा  सजल्या आहेत. शुक्रवारी सकाळपासूनच बुलडाणा शहरातील  बाजारात भाविकांची गणेश मूर्तीच्या खरेदीसाठी गर्दी केली होती.  त्यानंतर सायंकाळी गणेश मंडळांनी मिरवणूक काढत श्री गणेशाची  स्थापना केली. गणेश भक्तांमध्ये दिवसभर उत्साह दिसत होता.  अनेक गणेश भक्तांनी एक दिवस अगोदर गणेश मूर्तींची खरेदी  केली, तरी शुक्रवारी सकाळपासूनच बुलडाणा आठवडी बाजारा तील महात्मा फुले चौक, कारंजा चौक, बाजार लाइन, आठवडी  बाजार मार्ग आदी परिसरात गणेशमूर्ती आणि पूजाअर्चा साहित्याची  खरेदी करण्यासाठी आबालवृद्ध भाविकांची वर्दळ होती. शहरा तील बाजारपेठ विविध फुलांच्या दुकानांनी सजली असल्याने  सर्वत्र फुलांचा सुगंध दरवळत होता. गणेशमूर्ती घेऊन जाताना  गणेशभक्त गणपती बाप्पा मोरया, अशा जोशामध्ये जयजयकार  करीत असल्याने वातावरण प्रफुल्लित झाले होते.   
जिल्हय़ात या धार्मिक वातावरणात शांतता राखण्यासाठी  जिल्ह्याभरात  पोलीस अधीक्षकांसह उपविभागीय पोलीस  अधिकारी,  पोलीस कर्मचार्‍यांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.  रात्री १0 वाजेपर्यंत सार्वजनिक गणेश मंडळांकडून मूर्ती स्थापना  करण्यात आली. 

पावसामुळे गणेश उत्सवात आले चैतन्य!
यावर्षी पावसाळ्यात सुरुवातीला पाऊस झाल्यानंतर पावसाने दांडी  दिली. त्यामुळे जिल्हय़ातील सोयाबीन, तुरीसह अन्य पिके धोक्यात  आली होती. त्यामुळे यावर्षी पुन्हा दुष्काळाचा सामना करावा लाग तो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती; मात्र गत चार  दिवसांपासून जिल्हय़ात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पिकांना  संजीवनी मिळाली आहे. पावसाने दांडी दिल्याने सर्वत्र नैराश्याचे  वातावरण होते. तसेच आगामी उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा  सामना करावा लागेल, अशी चिंता होती; मात्र या पावसामुळे  सर्वांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. गणेशाच्या स्थापनेदरम्यान  पाऊस झाल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.   

२४८ गावात ‘एक गाव-एक गणपती’
जिल्ह्यातील ‘एक गाव-एक गणपती’ या संकल्पनेतून २४८ गावा त एक गाव-एक गणपती बसविण्यात आला. सामाजिक सलोखा  आणि सर्वधर्म समभाव गावात कायम राहावा याकरिता तंटामुक्त  मोहीम व पोलीस प्रशासनाच्यावतीने एका गावात एकच  सार्वजनिक गणेशाची स्थापना करण्याचे आवाहन करण्यात आले  होते. याला २४८ गावातील नागरिकांनी प्रतिसाद देत एकच  सार्वजनिक गणपती बसविला. 

Web Title: Arrival of Ganesha ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.