दुचाकी चाेरीप्रकरणी मुख्य आराेपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:36 IST2021-05-27T04:36:21+5:302021-05-27T04:36:21+5:30

लाेणार पाेलिसात दुचाकी चाेरीचे वेगवेगळे गुन्हे दाखल झाले हाेते. या चाेरीच्या प्रकरणाचा वरिष्ठ पाेलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी तपास ...

Arrested in two-wheeler theft case | दुचाकी चाेरीप्रकरणी मुख्य आराेपीस अटक

दुचाकी चाेरीप्रकरणी मुख्य आराेपीस अटक

लाेणार पाेलिसात दुचाकी चाेरीचे वेगवेगळे गुन्हे दाखल झाले हाेते. या चाेरीच्या प्रकरणाचा वरिष्ठ पाेलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी तपास सुरू करून वेगवेगळी पथके स्थापन केली हाेती़ विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पाहून पाेलिसांनी मुख्य आराेपी हरीस खान नशीर खान यास ताब्यात घेतले. त्याची चाैकशी केली असता त्याने लाेणार शहरातून विविध कंपन्यांच्या ११ दुचाकी जप्त केल्याचे सांगितले. दुचाकी चाेरल्यानंतर नंबरप्लेट बदलून तसेच आरसी बुकमध्ये खाेडखाड करून ताे विक्री करीत हाेता. गत पाच ते सहा महिन्यापासून दुचाकी चाेरी जाण्याचे प्रमाण वाढल्याने पाेलिसांनी शाेधमाेहिम राबविली. यामध्ये मुख्य आराेपीसह इतर आराेपींना अटक केली.ही कारवाई वरिष्ठ पाेलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, पाेउनि भारत बर्डे, हेकाॅ सुरेश काळे, पाेकाॅ कृष्णा निकम, पाेकाॅ चंद्रशेखर मुरडकर यांनी केली.

Web Title: Arrested in two-wheeler theft case