अवैध दारू विक्री करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:32 IST2021-04-13T04:32:27+5:302021-04-13T04:32:27+5:30

गेल्या आठवड्यात ११ ठिकाणी पोलिसांनी धाड टाकून अवैध दारू साठा जप्त केला आहे. साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक ...

Arrested for selling illegal liquor | अवैध दारू विक्री करणाऱ्यास अटक

अवैध दारू विक्री करणाऱ्यास अटक

गेल्या आठवड्यात ११ ठिकाणी पोलिसांनी धाड टाकून अवैध दारू साठा जप्त केला आहे. साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक ठिकाणी देशी दारूची अवैध विक्री सुरू असल्याची माहिती ठाणेदार जितेंद्र आडोळे यांना मिळताच त्यांनी साखरखेर्डा येथील दोन ठिकाणी, लोणी, गोरेगाव, हनवतखेड, शेंदुर्जन, वर्दडा पाठोपाठ माळखेड फाट्यावर छापा टाकला. दरम्यान, रविवारी सकाळी ठाणेदार जितेंद्र आडोळे, पीएसआय दीपक राणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश चव्हाण, पोलीस काँस्टेबल अनिल वाघ, राजू मापारी यांनी छापा टाकला असता माळखेड फाट्यावरील एका हाॅटेलवर अवैध दारू विक्री करतांना संजय माधवराव देशमुख (रा. लोणी) यांच्याकडून चार बाॅक्स किंमत १३ हजार ४६० रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहेत. आरोपीस अटकही विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अगोदर अनेक गावात फाट्यावर अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली असता मागील आठवड्यात ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कोविड काळात कडक लाॅकडाऊन असताना काही व्यक्तींनी सुशिक्षित बेकार युवकांना या धंद्यात ओढून आपली आर्थिक पोळी भाजून घेण्यासाठी दारू विक्रीचा व्यवसाय सुरू केल्याचे समजते.

Web Title: Arrested for selling illegal liquor