रेल्वेमार्गालगत मद्य विक्री करणाऱ्यास अटक

By Admin | Updated: April 26, 2017 00:02 IST2017-04-26T00:02:26+5:302017-04-26T00:02:26+5:30

नांदुरा : शहरातील रेल्वे लाईनजवळ विदेशी दारू विकणाऱ्याला २५ एप्रिलच्या दुपारी एलसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून त्याच्याकडून १७ हजार २३७ रूपयाचा माल जप्त केला.

The arrest of the people who sell the railroad wine | रेल्वेमार्गालगत मद्य विक्री करणाऱ्यास अटक

रेल्वेमार्गालगत मद्य विक्री करणाऱ्यास अटक

नांदुरा : शहरातील रेल्वे लाईनजवळ विदेशी दारू विकणाऱ्याला २५ एप्रिलच्या दुपारी एलसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून त्याच्याकडून १७ हजार २३७ रूपयाचा माल जप्त केला. मात्र या एलसीबीच्या कारवाईबाबत शहरात विविध तर्कवितर्क काढण्यात येत असल्याची चर्चा आहे.
एलसीबीचे पो. काँ. नदीम शेख यांनी नांदुरा पोलीस स्टेशनला तक्रार दिली की, रेल्वेलाईनजवळ प्रल्हाद विष्णु जुनगडे हे कोणताही परवाना नसताना त्यांच्याकडून एलसीबी पथकाने १७ हजार २३७ रूपयाची विदेशी दारू जप्त केली व त्यांच्याविरूध्द कलम ६५ ई नुसार गुन्ह्याची नोंद केली. एलसीबीच्या कारवाईनंतर शहरात विविध चर्चांना उत आला होता. या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. अवैध दारू विक्रीला एलसीबीच्या या कारवाईमुळे आळा बसेल.

Web Title: The arrest of the people who sell the railroad wine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.