दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीस अटक
By Admin | Updated: May 15, 2017 00:25 IST2017-05-15T00:25:20+5:302017-05-15T00:25:20+5:30
अमडापूर : अवैध धंदे करणाऱ्यांवर पोलिसांचा वचक निर्माण झाल्याचे चित्र दिसत असून, १३ मे रोजी रात्री दारूची वाहतूक करणाऱ्या एका आरोपीस अटक करण्यात आली.

दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीस अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
अमडापूर : अमडापूर पो.स्टे.चा प्रभारी पदभार पो.नि. नवलकर यांनी स्वीकारताच त्यांनी अमडापूर व परिसरात वरली मटका, अवैध दारू विक्री यावर चांगलाच प्रतिबंध लावल्याने आता परिसरात काही प्रमाणात या अवैध धंदे करणाऱ्यांवर पोलिसांचा वचक निर्माण झाल्याचे चित्र दिसत असून, १३ मे रोजी रात्री दारूची वाहतूक करणाऱ्या एका आरोपीस अटक करण्यात आली.
चिखली तालुक्यातील अमडापूर पोलीस स्टेशनांतर्गत येणाऱ्या मंगरूळ नवघरे येथून १३ मे रोजी रात्रीच्या दरम्यान आरोपी गुलाब नबी शे.गफ्फार रा.भोरसा भोरसी हा मंगरूळ नवघरे येथून ५३ देशी दारूच्या शिश्या किंमत २ हजार ६६० रू.चा माल भोरसा भोरसी येथे घेऊन जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने पो.नि. नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. उमेश भोसले, पो.काँ. राठोड यांनी या आरोपीवर पाळत ठेवून गुलाब नबी शे.गफ्फार रा.भोरसा भोरसी याला देशी दारूसह रंगेहात पकडून त्याचे विरुद्ध कलम ६५ (ई) प्रमाणे दारू बंदी कायद्यांतर्गत कार्यवाही केली आहे.