सेना पदाधिका-यांनी राजीनामे घेतले मागे
By Admin | Updated: September 29, 2016 01:47 IST2016-09-29T01:47:44+5:302016-09-29T01:47:44+5:30
भावना दुखावल्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील सेना पदाधिका-यांनी दिले होते राजीनामे.

सेना पदाधिका-यांनी राजीनामे घेतले मागे
मेहकर (जि. बुलडाणा), दि. २८- एका वर्तमानपत्रात आक्षेपार्ह व्यंगचित्र काढून मराठा समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी, तालुक्यातील अनेक शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी सदर प्रकरणाचा निषेध करून राजीनामे दिले होते. सदर राजीनामे गुरुवारी या पदाधिकार्यांनी मागे घेतले.
व्यंगचित्रामुळे आपल्या भावना दुखावल्याचा आरोप करीत शिवसेनेचे मेहकर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजय जाधव यांनी यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना नगरसेवक पदाचा राजीनामा पाठविला होता. सदर राजीनामा गुरुवारी मागे घेण्यात आला.
तसेच शिवसेना तालुकाप्रमुख सुरेश वाळूकर, उपतालुकाप्रमुख समाधान साबळे यांनीही शिवसेनेच्या पदाचा राजीनामा पाठविला होता. त्यांनीही आपला राजीनामा मागे घेतला. त्यांनी आपले राजीनामे परत घेतले, या प्रकरणाची जिल्ह्यात जोरदार चर्चा करण्यात आली.