दारूअड्डय़ांवर धाड; सहा अटकेत
By Admin | Updated: February 8, 2016 02:21 IST2016-02-08T02:21:07+5:302016-02-08T02:21:07+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाची कारवाई.

दारूअड्डय़ांवर धाड; सहा अटकेत
बुलडाणा : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शुक्रवारी मातला येथे विविध गावठी दारूअड्डय़ांवर धाडी टाकून सहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून ६२ लिटर दारूसह १३५0 रुपयांचा मोहाचा सडवा जप्त केला. मातला येथे विविध ठिकाणी सुरू असलेल्या गावठी दारूअड्डय़ांवर धाडी टाकून सांडू अजब बरडे, सिकंदर अशरफ बरडे, रज्जाक शब्बीर बरडे, रहमान रमजान बरडे, माजिद अजब बरडे, शालिग्राम उखर्डा सरोदे या सहा जणांना गावठी दारू काढताना रंगेहात पकडून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ६२ लिटर हातभट्टीची दारू, १३५0 रुपयांचा मोहाचा सडवा इतर साहित्य असा ३२४00 रुपयांचा माल जप्त केला.