सिंदखेडराजा : अर्थ सहाय राष्ट्रीय कुटूंब लाभ योजने अंतर्गत कर्ता पुरुषकिंवा कर्ती स्त्री मयत झाल्यास त्यांच्या वारसास सामाजिक न्याय व विशेषसहाय्य विभाग यांचे वतीने सिंदखेडराजा तालुक्यातील १६ लाभार्थ्यांनाप्रत्येकी २० हजार रुपयाच्या धनादेशाचे वाटप महसुल उपविभागीय अधिकारीडॉ.विवेक काळे, तहसिलदार संतोष कणसे, पोलिस निरिक्षक बळीराम गिते यांचेहस्ते २९ जुलै रोजी तहसिल कार्यालयात वाटप करण्यात आले. यावेळी संजयगांधी योजनेचे नायब तहसिलदार प्रिती जाधव यांनी प्रास्ताविक केले.प्रास्ताविकात त्यांनी या योजनेसाठी दारिद्रय रेषेचे प्रमाणपत्र व कर्तासदस्यांचे मृत्यू प्रमाणपत्र, वारसाचा दाखला व मृत्यू रजिस्टरच्यानोंदवही प्रमाणीत प्रता सह अर्ज एक वर्षाच्या आत दाखल करावा. त्यांना यायोजनेचा लाभ मिळतो. तसेच वारस व्यक्ती जर महिला असेल तर महिलेला इंदिरागांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजने अंतर्गत महिलेस दमहा ६०० रुपयेलाभ देण्यात येतो अशी माहिती दिली.तहसिलदार संतोष कणसे यांनी सन २०१३ ते २०१७ या त्यांच्या कार्यकाळातसिंदखेडराजा कार्यालयामार्फत अर्थसहाय राष्टीय कुटूंब लाभ योजने अंतर्गत२७५ अर्ज मंजूर करुन पंचाव लक्ष लाभ देण्यात आल्याची माहिती दिली.डॉ.विवेक काळे व बळीराम गिते या मान्यवरांच्या हस्ते १६ लाभार्थ्यांनाप्रत्येकी विस हजार या प्रमाणे तीन लाख विस हजार रुपयाचे धनादेश देण्यातआले. या वेळी डी.जी.राजपूत, उज्वला मुंढे तसेच लाभार्थी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)
अर्थ सहाय राष्ट्रीय कुटूंब लाभ योजने अंतर्गत धनादेश वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 13:42 IST