अर्थ सहाय राष्ट्रीय कुटूंब लाभ योजने अंतर्गत धनादेश वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 13:42 IST2017-07-30T13:42:55+5:302017-07-30T13:42:55+5:30

aratha-sahaaya-raasataraiya-kautauunba-laabha-yaojanae-antaragata-dhanaadaesa-vaatapa | अर्थ सहाय राष्ट्रीय कुटूंब लाभ योजने अंतर्गत धनादेश वाटप

अर्थ सहाय राष्ट्रीय कुटूंब लाभ योजने अंतर्गत धनादेश वाटप

सिंदखेडराजा : अर्थ सहाय राष्ट्रीय  कुटूंब लाभ योजने अंतर्गत कर्ता पुरुष
किंवा कर्ती स्त्री मयत झाल्यास त्यांच्या वारसास सामाजिक न्याय व विशेष
सहाय्य विभाग यांचे वतीने सिंदखेडराजा तालुक्यातील १६ लाभार्थ्यांना
प्रत्येकी २० हजार रुपयाच्या धनादेशाचे वाटप महसुल उपविभागीय अधिकारी
डॉ.विवेक काळे, तहसिलदार संतोष कणसे, पोलिस निरिक्षक बळीराम गिते यांचे
हस्ते २९ जुलै रोजी तहसिल कार्यालयात वाटप करण्यात आले. यावेळी संजय
गांधी योजनेचे नायब तहसिलदार प्रिती जाधव यांनी प्रास्ताविक केले.
प्रास्ताविकात त्यांनी या योजनेसाठी दारिद्रय रेषेचे प्रमाणपत्र व कर्ता
सदस्यांचे मृत्यू प्रमाणपत्र, वारसाचा दाखला व मृत्यू रजिस्टरच्या
नोंदवही प्रमाणीत प्रता सह अर्ज एक वर्षाच्या आत दाखल करावा. त्यांना या
योजनेचा लाभ मिळतो. तसेच वारस व्यक्ती जर महिला असेल तर महिलेला इंदिरा
गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजने अंतर्गत महिलेस दमहा ६०० रुपये
लाभ देण्यात येतो अशी माहिती दिली.
तहसिलदार संतोष कणसे यांनी सन २०१३ ते २०१७ या त्यांच्या कार्यकाळात
सिंदखेडराजा कार्यालयामार्फत अर्थसहाय राष्टीय कुटूंब लाभ योजने अंतर्गत
२७५ अर्ज मंजूर करुन पंचाव लक्ष लाभ देण्यात आल्याची माहिती दिली.
डॉ.विवेक काळे व बळीराम गिते या मान्यवरांच्या हस्ते १६ लाभार्थ्यांना
प्रत्येकी विस हजार या प्रमाणे तीन लाख विस हजार रुपयाचे धनादेश देण्यात
आले. या वेळी डी.जी.राजपूत, उज्वला मुंढे तसेच लाभार्थी उपस्थित होते.
(शहर प्रतिनिधी)

Web Title: aratha-sahaaya-raasataraiya-kautauunba-laabha-yaojanae-antaragata-dhanaadaesa-vaatapa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.