रस्त्यांसाठी १७ कोटी २४ लाख रुपयाला मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:30 IST2021-04-05T04:30:53+5:302021-04-05T04:30:53+5:30

यामुळे मतदारसंघातील विविध रस्त्यांची कामे लवकरच पूर्णत्वास जाणार आहेत. या कामांमध्ये मोताळा तालुक्यातील वरूड गाव ते सुलतानपूर इब्राहिमपूर हा ...

Approval of Rs. 17 crore 24 lakhs for roads | रस्त्यांसाठी १७ कोटी २४ लाख रुपयाला मान्यता

रस्त्यांसाठी १७ कोटी २४ लाख रुपयाला मान्यता

यामुळे मतदारसंघातील विविध रस्त्यांची कामे लवकरच पूर्णत्वास जाणार आहेत. या कामांमध्ये मोताळा तालुक्यातील वरूड गाव ते सुलतानपूर इब्राहिमपूर हा ४.८० किलोमीटर लांबीचा रस्ता, पिंपरी गवळी ते काबरखेड रस्त्याला जोडणारा ३.१४ किलोमीटर लांबीचा काबरखेड ते हनवतखेड रस्ता, तसेच बुलडाणा तालुक्यामधील देऊळघाट ते उमाळा-अंबोडा २.३० किलोमीटर रस्ता व साखळी बुद्रुक ते हतेडी बुद्रुक असा सात किलोमीटर लांबीचा रस्ता, आदी कामांचा समावेश आहे. ही कामे लवकरच सुरू होणार असून, मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे खा. प्रतापराव जाधव व आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विकासाचा वेग मंदावला तरीसुद्धा सातत्याने प्रयत्न करून मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलून टाकू व विकासाचे नवीन पर्व सुरू करू, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Approval of Rs. 17 crore 24 lakhs for roads