बनावट कागदपत्राच्या आधारे दिली नियुक्ती
By Admin | Updated: July 10, 2015 00:04 IST2015-07-10T00:04:37+5:302015-07-10T00:04:37+5:30
शाळा बंद असताना ९ शिक्षक आणि ५ शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत दाखविले.

बनावट कागदपत्राच्या आधारे दिली नियुक्ती
बुलडाणा : वाल्मिकेश्वर विद्यालय वरवंड या संस्थेने बनावट कागदपत्राच्या आधारे कर्मचार्यांच्या नियुक्त्या करून वैयक्तिक पदमान्यता करून घेतली. नियुक्ती बेकायदेशीर असून, त्या रद्द करण्यात याव्या, या मागणीसाठी लहु सखाराम गवई, मदन बाबूराव इजळे, गजानन लोढे या शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ७ जुलैपासून उपोषण सुरू केले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शैक्षणिक सत्र २00५ ते २00८ या चार वर्षांच्या कालावधीमध्ये सदर शाळा बंद होती. या बंद कालावधीत २९.४.२0११ रोजी संस्थाचालकांनी १२ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना बनावट कागदपत्राच्या आधारे वैयक्तिक पदमंजुरात करून घेतली. विशेष म्हणजे २00८ मध्ये शाळा बंद असताना ९ शिक्षक आणि ५ शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत असल्याचे दाखवून शिक्षकाच्या नेमणुका एकाच दिवशी करण्यात आल्या.