बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचा आणखी एक बळी, ३६ पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 13:01 IST2021-01-16T13:00:58+5:302021-01-16T13:01:23+5:30
CoronaVirus News नांदुरा रोड, मोताळा येथील ५० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान स्त्री रुग्णालय येथे मृत्यू झाला.

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचा आणखी एक बळी, ३६ पाॅझिटिव्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या वाढतच असून, शुक्रवारी आणखी ३६ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. नांदुरा रोड, मोताळा येथील ५० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान स्त्री रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे, तसेच ६९४ अहवाल निगेटिव्ह आले आहे. २६ जणांची काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ७३० अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ६९४ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, ३६ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील २९ व रॅपीड अँटिजन टेस्टमधील ७ अहवालांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये बुलडाणा शहरातील १०, बुलडाणा तालुक्यातील भादोला १, शेलसूर १, चिखली शहरातील ४, चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर १, नांदुरा शहरातील दाेन, दे. राजा शहरातील दाेन, मोताळा शहरातील एक, मोताळा तालुक्यातील सारोळा मारोती १, मेहकर तालुक्यातील कल्याणा १, लोणार शहरातील चार, दुसरबीड १, शेगांव शहरातील सात जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे, तसेच काेराेनावर मात केल्याने सिं. राजा काेविड सेंटर येथील एक, खामगांव येथील १, चिखली ७, नांदुरा १, बुलडाणा अपंग विद्यालय ७, स्त्री रुग्णालय ७, मेहकर १, लोणार येथील एकाला सुट्टी देण्यात आली आहे.