Another death in Buldana district, 22 cases positive | बुलडाणा जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू, २२ काेराेना पाॅझिटिव्ह

बुलडाणा जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू, २२ काेराेना पाॅझिटिव्ह

 

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून शनिवारी माेताळा तालुक्यातील तळणी येथील ८० वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच २२ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. ८१९ अहवाल निगेटिव्ह आले असून ५६ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. 
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजट टेस्ट कीटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ८४१ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ८१९ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून २२ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत.  
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये संग्रामपूर तालुका अकोली १, शेगाव शहर १, चिखली तालुका  गांगलगाव १, मुंगसरी १, चिखली शहर ३, दे. राजा शहरातील तीन, लोणार तालुका  खुरमपूर १,  दे. राजा तालुका   जवळखेड १, सिनगाव जहागीर १, तुळजापूर १, खामगाव तालुका  भालेगाव १,  खामगाव शहर ४, मेहकर तालुका जानेफळ १, जळगाव जामोद शहरातील दाेघांचा समावेश आहे. आज काेराेनावर मात केल्याने बुलडाणा  अपंग विद्यालयातून ९, स्त्री रुग्णालय ३,  दे. राजा शहरातील ७, चिखली ११, मोताळा ५, खामगाव ९, नांदुरा १, संग्रामपूर २, शेगाव ८, जळगाव जामोद येथून एकाला सुटी देण्यात आली आहे.  
  तसेच आजपर्यंत १ लाख रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.   तसेच ३ हजार ५९० स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल एक लक्ष आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण  १३ हजार ५६१  कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी १३ हजार ७२ कोरोनाबाधीत रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रुग्णालयात ३२५ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत १६४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी  यांनी दिली आहे.

Web Title: Another death in Buldana district, 22 cases positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.